america judg block order to ban tiktok in country 
ग्लोबल

'टिकटॉक'वरील बंदीला स्‍थगिती; न्यायालयाचा ट्रम्प यांना दणका

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प यांच्या प्रशासनाने टिकटॉक या अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ ॲपवर घातलेल्या बंदीला येथील मध्यवर्ती न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिली.

ट्रम्प यांच्या आदेशामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची तक्रार पेनसिल्व्हिनियातील एक विनोदवीर डग्लस मारलँड, टीकटॉकवर व्हिडिओ तयार करणारे दक्षिण कॅलिफोर्नियातील डिझायनर कॉसेट रिनाब आणि कनेक्टिकट येथील संगीतकार ॲलेक चेंबर यांनी केली आहे. ॲप बंद झाल्यास उदरनिर्वाहाचे साधन हिरावले जाईल, अशी चिंता त्‍यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (ता. ३०) सुनावणी झाली.

अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश वेंडी बिटलस्टोन यांनी अमेरिकेत टिकटॉकवरील बंदीच्या वाणिज्य विभागाच्या आदेशाला स्थगिती दिली. बंदी आदेश १२ नोव्हेंबरपासून देशात लागू होणार होता. हे ॲप बंद झाले तर व्हिडिओ निर्माणकर्त्यांचे लाखो फॉलोअर कमी होतील आणि त्यांना ब्रँड प्रायोजकत्व मिळणेही बंद होईल.

अमेरिकेच्या सुरक्षेला धोका
टिकटॉक हे ‘बाइटडान्स’ या चीनी कंपनीचे ॲप आहे. यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असून टिकटॉक वापरकर्त्यांच्या डेटाची चोरी व त्यांच्यावर गुप्त नजर ठेवण्याची पूर्ण खात्री असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे या ॲपवर बंदी घालण्याच्या हालचाली ऑगस्टपासून सुरू आहेत. यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी १२ नोव्हेंबरपासून होणार होती. पण आता न्यायालयाच्या निर्णयानंतर आता अमेरिकेचे सरकार टिकटॉकवर बंदी घालू शकत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Sharad Pawar: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी घेतली दखल; ‘सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

करकायदा : ‘आयटीसी’बाबत सुधारणा...

आजचे राशिभविष्य - ०५ ऑक्टोबर २०२६

शेअर बाजार : रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (गुरुवारचा बंद भाव : रु. ८४१)

SCROLL FOR NEXT