Pelosi Visit Sakal
ग्लोबल

नॅन्सी पेलोसींच्या भेटीने तणाव; अमेरिकेने तैवानमध्ये 'पाऊल' टाकताच चीनच्या लष्करी हालचाली वाढल्या

पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निवेदन जारी केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निवेदन जारी केले आहे.

अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी मंगळवारी तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. चीनने दिलेला गंभीर परिणामांचा इशारा धुडकावून पेलोसी दाखल झाल्याने आता जागतिक राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून चीनने पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला विरोध केला होता. 'याची जबर किंमत अमेरिकेला चुकवावी लागेल,' असेही चीनने म्हटले होते. दरम्यान, नॅन्सी पेलोसींच्या भेटीने तणाव निर्माण झाला असून आता चीनच्या लष्करी हालचाली वाढल्या आहेत.

तैवानमध्ये आल्यानंतर नॅन्सी पेलोसी म्हणाल्या की, तैवानचा दौरा अमेरिकेच्या लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेचा सन्मान करतो. आम्ही लोकशाहीचे समर्थन करतो. त्यांनी ट्विट केले की, तैवानच्या 23 दशलक्ष लोकांसोबत अमेरिकेची एकता आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, कारण जगाला निरंकुशता आणि लोकशाही यातील निवडीचा सामना करावा लागत आहे, असं ट्वीट नॅन्सी पेलोसी यांनी केलं आहे.

दरम्यान, पेलोसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनने शियामेन शहराच्या बाजूने पूर्व किनाऱ्याकडील हवाई क्षेत्र बंद केले होते. मात्र, अमेरिकी हवाई दलाच्या विमानाने पेलोसी शिष्टमंडळासह तैपेई विमानतळावर दाखल झाल्या. या दरम्यान चीनच्या एसयू-३५ लढाऊ विमानांनी तैवानची सामुद्रधुनी ओलांडल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू त्यांच्या स्वागतासाठी विमातळावर उपस्थित होते.

नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होणार असून, पेलोसी यांच्या कृतीमुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे, असे चीनने म्हटले आहे. पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निवेदन जारी केले आहे. पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे 'एक चीन तत्त्वा'चे आणि चीन व अमेरिकेच्या तीन संयुक्त निवेदनांचे गंभीर उल्लंघन झाले आहे, असे चीनने म्हटले आहे.

नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल होताच तैवानच्या सामुद्रधुनीत चीनकडून लष्करी हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या एसयू-३५ विमानांनी तैवानची सामुद्रधुनी ओलांडल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. सैन्य दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे चीनच्या ईस्टर्न थिएटर कमांडने म्हटले आहे. त्यामुळे आता जागतिक पातळीवर आणखी काय बदल होणार पहावे लागणार आहे.

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे संतप्त झालेल्या चीनने म्हटले आहे की, अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील. एएफपी वृत्तसंस्थेने तैवान येथील लष्कराच्या हवाल्याने म्हटले आहे की, 21 चिनी लष्करी विमानांनी एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये प्रवेश केला. यादरम्यान चीनने आपले KJ500 AWACS विमान आणि JF16, JF11, Y9 EW आणि Y8 ELINT विमान तैनात केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT