Community Farming Sakal
ग्लोबल

Community Farming: महागाईचा सामना करण्यासाठी अमेरिकी लोकांनी शोधला उपाय; भारतीयांनीही घ्यायला हवा आदर्श

अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये महागाईचा सामना करण्यासाठी कम्युनिटी फार्मिंगची कल्पना पुढे येत आहे. काय आहे कम्युनिटी फार्मिंग? जाणून घ्या...

वैष्णवी कारंजकर

अमेरिकेतल्या अन्नधान्याच्या महागाईने गेल्या ५० टक्क्यांचा विक्रम मोडला आहे. अशात अमेरिकेतल्या कोलंबिया, मिसौरी, अटलांटा, मिनिसोटा अशा राज्यांमध्ये महागाईचा सामना करण्यासाठी कम्युनिटी फार्मिंगची कल्पना पुढे येत आहे. काय आहे कम्युनिटी फार्मिंग? जाणून घ्या...

या शहरांमधले लोक दिवसातले काही तास शेती करतात. कम्युनिटी फार्मिंगमध्ये लोक आपली शेती किंवा बाग बगिच्यामध्ये भाज्या - फळं लावतात जेणेकरून त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण होऊ शकतील. सर्वजण या फार्मिंगमध्ये भागीदार असतात. म्हणजे लावणीपासून उत्पादनापर्यंत सर्वकाही वाटून घेतलं जातं. कम्युनिटी फार्मिंगच्या माध्यमातून उत्पादन वाढतं. वेगवेगळी शेती केल्याने उत्पादन कमी होतं.

घरखर्चामध्ये ४० टक्क्यांपर्यंतची बचत

मिसौरी इथले जोसेफ सांगतात की त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना कम्युनिटी फार्मिंग करताना पाहिलं आणि त्याचे फायदे लक्षात आले. जोसेफ यांना जेव्हा लक्षात आलं की त्यांच्या घरचं महिन्याचं भाजीपाल्याचं खर्च वाढत चालला आहे, तेव्हा त्यांनीही कम्युनिटी फार्मिंगचा पर्याय निवडला. अटलांटाच्या मॅरियन यांनी सांगितलं की कम्युनिटी फार्मिंगसाठी त्यांना २० हजार रुपये मेंबरशिप फी द्यायला लागली. गेल्या ६ महिन्यांपासून त्या कम्युनिटी फार्मिंगच्या मदतीने आपल्या नियमित गरजा भागवत आहे. यामुळे त्यांच्या घरखर्चामध्ये मासिक ४० टक्के बचत होत आहे.

शेतीसाठी लोक बाग किंवा प्लॉटही भाड्याने देतात

न्यूयॉर्कच्या जाहिक अफसर यांनीही कम्युनिटी फार्मिंगचा पर्याय निवडला आहे. जाहिदने कम्युनिटी फार्मिंगला प्रोत्साहन देण्यासाठी प्लांट बायबल ही वेबसाईटही सुरू केली आहे. कम्युनिटी फार्मिंगची वाढती लोकप्रियता पाहता अमेरिकी लोक आता याला बिझनेस मॉडेल म्हणून पाहत आहेत. लोक आपली बाग किंवा प्लॉट कम्युनिटी फार्मिंगसाठी भाड्याने देऊन पैसे कमवत आहेत.

बाजारपेठेवर अवलंबित्व झालं कमी; घरातच सुरू झाली शेती

वॉशिंग्टनच्या अॅलेक्सिया यांनी ८ एकरामध्ये कम्युनिटी फार्मिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. अॅलेक्सिया सांगतात की, गेल्या ६ महिन्यांपासून त्यांनी बाजारातून भाजीपाला घेतलेला नाही. भाज्या आणि आवश्यक अन्नपदार्थ ते कम्युनिटी फार्मिंगच्या माध्यमातून मिळवतात. हे पदार्थ पॅक्ड फूडपेक्षा चांगले असतात. याशिवाय रोज शेती केल्याने वर्कआऊटही होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT