USA-Lockdown 
ग्लोबल

अमेरिकेतले बीच गर्दीने फुलले; सोशल डिस्टंसिन्गचे वाजले तीन तेरा!

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : अमेरिकेतील अनेक राज्यांतील लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर आता लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडले असून देशातील प्रमुख समुद्र किनारे सोमवारी (ता.२५) गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते.

अनेकांनी बोटिंगचा आनंद घेतला तर काहींनी मासेमारी करत आणि सनबाथ घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अमेरिकेत कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा एक लाखांवर गेला असतानाही सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

अमेरिकेतील तब्ब्ल ५० राज्यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले असून यामध्ये अलाबामा, अर्कान्सास, मिनेसोटा, उत्तर डाकोटा, न्यू हॅम्पशायर, मेरीलँड, मेने, नावेदा, उटाह, व्हर्जिनिया आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. दरम्यान या राज्यांतील बाधितांची संख्या वाढत चालली असून त्यामागे वाढलेल्या चाचण्या हे कारण आहे की संसर्ग हे मात्र स्पष्ट झालेले नाही. 

सोशल मीडियात प्रतिबिंब 
अमेरिकेतील पूर्ववत झालेल्या जनजीवनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात काही दुकाने उघडी झाल्याचे दिसून आले असून ग्राहकांनी देखील खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. मास्क न घालणाऱ्या लोकांना दुकानदारच विरोध करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश लोकांनी सोशल डिस्टंसिन्गचे पालन केले तर फ्लोरिडा आणि अन्य राज्यांत लॉकडाउनचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. 

गर्दीमध्ये मिसळल्यानंतर प्रत्येकाने मास्क घालणे गरजेचे आहे, कारण यामध्यमातूनच आपण संसर्ग रोखू शकतो. 
डॉ. देबोराह बिर्क्स, व्हाईट हाऊसच्या कृती पथकाचे समन्वयक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT