boris johnson 
ग्लोबल

ब्रिटनमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर; कोरोना संक्रमणाचा वाढला कहर

सकाळवृत्तसेवा

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी काल सोमवारी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय जाहीर करताना ते म्हणाले की, येणारे काही आठवडे आतापर्यंतचे कठीण आठवडे असतील मात्र माझा विश्वास आहे की आपण या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत.

पुढे त्यांनी म्हटलं की, जर मृत्यूदर घटला आणि लशीकरणाचा अपेक्षित  परिणाम साधला तर आपण लवकरच फेब्रुवारी 2021 मध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ शकू. आपण इतिहासातील सर्वांत मोठी लशीकरणाचा कार्यक्रम पार पाडत आहोत. आपण इतर युरोपियन देशांहून अधिक असलेल्या ब्रिटनमधील मोठ्या लोकसंख्येचे लशीकरण करत आहोत, असंही त्यांनी म्हटलं.

हा देशव्यापी लॉकडाऊन फेब्रुवारी मध्यापर्यंत कार्यान्वित राहिल. ब्रिटन सरकारने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, गरजेची नसलेली सर्व दुकाने आणि इतर सेवा बंद राहतील. देशातील हॉटेल्स 'टेकआऊट सर्व्हीसेस' पद्धतीने सुरु राहतील. शिवाय, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि कॉलेजेस देखील बंद राहतील. युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना देखील फेब्रुवारी मध्यापर्यंत कॅम्पसमध्ये परतू नये असा आदेश देण्यात आला आहे.

कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडल्यानंतर तिथे अत्यंत गतीने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक रुग्णांची भर या आठवड्यात झाली आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखीन बिघडून हाताबाहेर जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Jolle Halsiddhnath Sugar Factory: निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याची २०२६-२७ हंगामासाठी ३७७० रुपये पहिली उचल जाहीर

Sonia Gandhi Book : "अजिबात नाही!"; भारताचे पंतप्रधानपद का नाकारले? अनेक वर्षांनंतर गांधी घराण्यातील 'त्या' निर्णयामागचे सत्य उघड!

RRC Mumbai Apprentices 2026: दहावी पास तरुणांसाठी रेल्वेत प्रशिक्षणाची मोठी संधी! २८६१ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Live Update: राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

उद्यापासून ६ राशींचे अच्छे दिन सुरू! बुधाच्या उदयामुळे नोकरी, पैसा अन् शिक्षणात मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT