Pakistan,Poverty 
ग्लोबल

धक्कादायक! बायकोसोबत भांडण झालं आणि पतीने पाच लेकरांना कॅनॉलमध्ये फेकलं

सकाळ ऑनलाइन टीम

आर्थिक अडचणीमुळे वैतागलेल्या एकाने चक्क आपल्या पाच मुलांना कॅनॉलमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये रविवारी हा प्रकार घडला.  संबंधित व्यक्तीने जंबेर कॅनोलमध्ये आपल्या मुलांना फेकून दिले. स्थानिक पोलिसांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती दारिद्यामुळे खचला होता. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

डॉनच्या वृत्तानुसार, या प्रकरणात मोहम्मद इब्राहिमला अटक करण्यात आली आहे. तो रिक्षा चालक आहे. त्याने आपल्या मुलांना ज्या जुबेर कॅनॉलमध्ये फेकले तेथूनच त्याला अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. 1 वर्षांचा अहमद आणि 4 वर्षांची फिझा या दोन मुलांचे मृतदेह मिळाले असून 3 वर्षांची तशा, 5 वर्षांचा झैन आणि 7 वर्षांची नादिया ही मुलं अद्यापही सापडलेली नाहीत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षींय मोहम्मद इब्राहिमची पत्नी रझिया बीवी तिच्या माहेरीच आपल्या मुलांसोबत राहत होती. इब्राहिम आपल्या मुलांना भेटायला सासरी गेला. त्यावेळी आर्थिक अडचणींमुळे दोघांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणानंतर तो आपल्या पाचही मुलांना रिक्षातून घेऊन जंबर गावाच्या दिशेने निघून आला. त्याने वाटेवर असलेल्या कॅनॉलमध्ये मुलांना फेकून दिले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT