Russia Ukraine Conflict टिम ई सकाळ
ग्लोबल

Russia Ukraine Conflict : NATO म्हणजे काय? युद्धाची ठिणगी यामुळेच पडली?

युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा आहे

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर हल्ला करत आज युद्धाला सुरुवात केली आहे. सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत होता. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे मात्र अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नसल्याने युक्रेन आणि नाटो (NATO) देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय आहे. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळण्याला रशियाचा तीव्र विरोध आहे. तसं झालं तर आशियातील रशियाचं महत्त्व कमी होणार, अशी भीती रशियाला होती.

नाटो (NATO) काय आहे?

नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. नाटोची स्थापना ४ एप्रिल १९४९ रोजी १२ राष्ट्रांनी केली. दुसऱ्या महायुध्दानंतर नाटोची स्थापना करण्यात आली. उत्तर अटलांटिक प्रदेशातील राष्ट्रांमध्ये राजकीय स्वातंत्र्य, समान संस्कृती व आर्थिक स्थैर्य निर्माण करून सहकार्या देणे व सभासद राष्ट्रांना संरक्षण देणे, या गोष्टी सर्व सभासद राष्ट्रांवर बंधकारक आहेत.

रशियाला नाटोपासुन कोणती अडचण?

दुसरं महायुद्धानंतर सोव्हिएत युनियननं पूर्व युरोपातील भागांतून सैन्य मागे घेण्यास नकार दिला होता. अमेरिकेनं 1949 मध्ये सोव्हिएत युनियनचं विस्तारवादी धोरण थांबवण्यासाठी NATO ची स्थापना केली. जेव्हा NATO ची स्थापना झाली, तेव्हा त्यात 12 देशांचा समावेश होता. आज नाटोमध्ये 30 देशांचा समावेश आहे. पुतिन यांना रशियाचाही NATO मध्ये समावेश करायचा होता. पण आता पुतिनच नाटोचा तिरस्कार करत आहेत. जर युक्रेनही नाटोमध्ये सहभा़गी झाले तर रशियाच्या सीमा पूर्णपणे घेरल्या जातील. हे रशियासाठी मोठं आव्हान आहे. त्यामुळे नाटोने पूर्व युरोपमधील आपला विस्तार थांबवावा अशी रशियाची मागणी आहे.

खरं तर युक्रेन आणि युरोपीय देशांची वाढती जवळीक ही रशियासाठी चिंतेचा विषय बनली आहे. रशियाकडून युक्रेनला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन नाटोने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा युरोपीय महासंघाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. यावर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो या लष्करी संघटनेने युक्रेनला लष्करी बळ पुरविण्याचा निर्णय घेत रशियावर दबाव निर्माण केला होता. 'नाटो'ने पूर्व युरोपमध्ये लढाऊ विमाने व युद्धनौका पाठविण्यास सुरुवात केली होती. या सर्वाचा परिणाम रशियावर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

Video Viral: पाकिस्तानी गोलंदाजाने आज मार खाल्लाच असता... फलंदाजाने बॅट उगारली, दोघांनी अडवले नाहीतर घडला असता अनर्थ...

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांची चांदी! ७ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; योगी सरकारकडून पगारवाढीचं मोठं 'गिफ्ट'!

बदमाश पाकिस्तानी ! Mohsin Naqvi ने पत्रकाराला किडनॅप केले? PCB प्रमुखावर गंभीर आरोप, एका Video ने जगभरात खळबळ

State Cooperative Bank Profit: सामाजिक बांधिलकीसह आर्थिक बळकटी; राज्य सहकारी बँकेचा नफा ७०२ कोटींवर, सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

SCROLL FOR NEXT