MP Asaduddin Owaisi e sakal
ग्लोबल

Asaduddin Owaisi: "तुम्ही पाकिस्तानी मुस्लिमांना भाऊ मानता की नाही?" तरुणांच्या प्रश्नावर ओवैसी काय म्हणाले?

Sandip Kapde

Asaduddin Owaisi : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ओवैसी त्यांच्या समर्थकांना भेटी देत आहेत. शिकागो येथे आयोजित एका कार्यक्रमात एका तरुणाने ओवैसींना पाकिस्तानी मुस्लिमांबद्दल विचारले. यावर ओवैसी यांनी रोखठोक उत्तर दिले. यावेळी त्यांनी २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याचा देखील उल्लेख केला.

कार्यक्रमावेळी एका तरुणाच्या प्रश्नावर खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, देशाची फाळणी झाली तेव्हा आमच्यातील काही वरिष्ठांनी विरोध केला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या वरिष्ठांनी बलिदान दिले. जे रझाकार होते ते निघून गेले आणि जे निष्ठावंत होते ते राहिले.

यानंतर ओवैसी यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत पाकिस्तानला घेरले. ते म्हणाले, मुंबई हल्ल्याचे हल्लेखोर पाकिस्तानातून आले असून ते कोणीही नाकारू शकत नाही.

यानंतर ओवैसी यांनी संसद भवनाच्या नवीन इमारतीत अखंड भारताच्या नकाशावरही भाष्य केले. अखंड भारताच्या नकाशात पाकिस्तान, बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तानलाही भारताचा भाग दाखवण्यात आले असल्याते त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

PMC power saving deal flop: वीज बचतीचा 'महा-फ्लॉप' करार - महाप्रितला भार सोसेना

Gadhinglaj MIDC Industrial Growth Analysis : कोल्हापूर, कागल एमआयडीसी 'फुल्ल'! गडहिंग्लजमध्ये सात हेक्टर जागा शिल्लक; नव्या उद्योगांसाठी मोठी संधी

सोलापूरच्या सुपूत्राच्या ‘मदार’ चित्रपटाने पाणावले डोळे! पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, फ्रान्सच्या ‘कान्स’ महोत्सवात कौतूक, वाचा...

SCROLL FOR NEXT