ग्लोबल

Odisha train accident : तर मोदी आता रेल्वे अपघाताचे खापर आमच्यावर फोडतील; परदेशात राहुल गांधींचे मोठं वक्तव्य

धनश्री ओतारी

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. या घटनेवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आह. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. (Ask about Odisha train accident and BJP will say what Congress did 50 yrs ago Rahul Gandhi in US)

“तुम्ही त्यांना काहीही विचारा. ते मागे वळून पाहतील आणि उत्तरे देतील. तुम्ही त्यांना विचारा की ओडिशातील रेल्वे अपघात कसा झाला? ते काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी काय केलं याबद्दल बोलतील”, असं राहुल गांधी म्हणाले.

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे असून अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

काय म्हणाले राहुल गांधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार वास्तवाला स्वीकारत नाही. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना असाच एक रेल्वे अपघात घडला होता. इंग्रजांच्या चुकीमुळे ट्रेनला अपघात झाला असे काँग्रेसने तेव्हा म्हटले नव्हते. तर, आम्ही आमची जबाबदारी स्वीकारून तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. परंतु, भाजपा सरकार हे स्वीकरत नाही. ते सबबी काढतात आणि वास्तव स्वीकारत नाहीत.

इतकेच नव्हे तर भाजपाला दोषारोप करणे आणि चुका न स्वीकारण्याची आहे. भाजप कोणत्याही गोष्टीचा संदर्भ इतिहासाशी जोडतं. या अपघाताबद्दल जरी विचारलं तरी ते इतिहासाशी त्याचा संबंध जोडतील. भाजपला विचारलं की हा ओडिसातील रेल्वे अपघात कसा झाला तर ते म्हणतील, की काँग्रेसने मागच्या 50 वर्षात काय केलं?, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ओडीसातील बालासोरजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात झाला. अप लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला कोरोमंडल एक्स्प्रेसने धडक दिेली. त्यानंतर रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या पटरीवर आदळले. तिथून जाणाऱ्या बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसलाही यामुळे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT