Cristina Fernandez de Kirchner
Cristina Fernandez de Kirchner esakal
ग्लोबल

VIDEO : अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडिसांच्या हत्येचा प्रयत्न; बंदूकधारी व्यक्तीला अटक

सकाळ डिजिटल टीम

देशाचे अर्थमंत्री सर्जियो मस्सा यांनी या घटनेला ‘हत्येचा प्रयत्न’ म्हटलंय.

ब्यूनस आयर्स : काल (गुरुवार) रात्री उशिरा एका बंदूकधारी व्यक्तीनं अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती (Vice President of Argentina) क्रिस्टीना फर्नांडिस डी किर्चनर (Cristina Fernandez de Kirchner) यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी (Argentina Police) त्याला अटक केलीय. स्थानिक वेळेनुसार, गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडलीय.

देशाचे अर्थमंत्री सर्जियो मस्सा यांनी या घटनेला ‘हत्येचा प्रयत्न’ म्हटलंय. अर्थमंत्री मस्सा (Sergio Massa) यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'जेव्हा द्वेष आणि हिंसा वर्चस्व गाजवते, तेव्हा समाज नष्ट होतो आणि अशा परिस्थिती निर्माण होतात.' रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीनं उपराष्ट्रपतींना त्यांच्या घराच्या दारातच मारण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरानं उपराष्ट्रपतींना बंदुकीचा धाक दाखवला, पण त्यानं गोळीबार केला नाही.

ही घटना ब्यूनस आयर्समधील (Buenos Aires) उपराष्ट्रपती फर्नांडीस डी किर्चनर यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर घडली. जिथं शेकडो आंदोलक अलीकडच्या काही दिवसांत माजी राष्ट्रपतींना पाठिंबा देण्यासाठी जमले आहेत. फर्नांडीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका पोलिस प्रवक्त्यानं रॉयटर्सला सांगितलं की, उपराष्ट्रपतींच्या घराजवळ एका बंदूकधारी व्यक्तीला अटक करण्यात आली. घटनास्थळापासून काही अंतरावर एक शस्त्रंही सापडलं आहे. बंदूकधारी व्यक्ती मूळची ब्राझीलची असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT