vaccine france 
ग्लोबल

एस्ट्राझेनेकाचा दुष्परिणाम; फ्रान्समध्ये दुसरा डोस वेगळ्या लसीचा

सकाळ डिजिटल टीम

पॅरिस -  फ्रान्समध्ये एस्ट्राझेनेकाचा पहिला डोस देण्यात आलेल्या व्यक्तींना दुसरा डोस वेगळ्या कंपनीच्या लसीचा देण्यात येईल. ५५ वर्षांखालील वयोगटासाठी हा निर्णय असून तो सुमारे पाच लाख ३३ हजार नागरिकांना लागू होईल. दुष्परिणाम टाळण्याचा यामागील उद्देश आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने गेल्या महिन्यात ५५ वर्षांवरील वयोगटासाठी केवळ अॅस्ट्राझेनेकाच्या लसीची शिफारस केली होती. या वयोगटातील कमी वयाच्या व्यक्तींना त्रास झाल्याचे प्रमाण फार कमी असल्याचा अहवाल होता. वय ५५ पेक्षा कमी असल्यास दुसरा डोसही अॅस्ट्राझेनेकाच घ्यावा असेही सांगण्यात आले होते, मात्र आता या वयोगटातील व्यक्तींना फायझर बायोएन्टेक किंवा मॉडर्ना यापैकी एका कंपनीचा दुसरा डोस देण्यात येईल. 

फायझरची ऑर्डर ऑस्ट्रेलियाकडून दुप्पट
एस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गाठी होत असल्याच्या घटनांमुळे ऑस्ट्रेलियाने फायझरच्या लशीची ऑर्डर दुप्पट केली आहे. ऑक्टोबरपर्यंत अडीच कोटी जनतेचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ऑस्ट्रेलियाने ठेवले असून हा देश प्रामुख्याने अॅस्ट्राझेनेकाच्या लसीवर अवलंबून होता. त्यासाठी प्रत्येकी दोन डोस याप्रमाणे पाच कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली. हे डोस सीएसएल ही स्थानिक कंपनी बनविणार आहे. आता हे संपूर्ण नियोजन बदलण्यात आले. फायझरची २ कोटी डोसची ऑर्डर चार कोटी करण्यात आली. त्यामुळे एक चतुर्थांश ते एक पंचमांश जनतेचे लसीकरण वर्षअखेरपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. ५० वर्षांखालील व्यक्तींनी फायझरचा डोस घ्यावा अशी शिफारस जारी करण्यात आली.

अॅस्ट्राझेनेका लसीच्या वापराला आम्ही प्रतिबंध केलेला नाही. ५० वर्षांवरील व्यक्तींनी हीच लस घ्यावी असा आग्रह आहे.
- स्कॉट मॉरीसन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान 

हाँगकाँगकडून ऑर्डर रद्द
अॅस्ट्राझेनेका कंपनीने आधीच्या नियोजनानुसार या वर्षी लसीचा पुरवठा करू नये, तशी गरज नाही, असे कळवीत हाँगकाँगने ऑर्डर रद्द केली. लसीच्या दुष्परिणामांच्या भीतीने तसेच जागतिक पातळीवर लशीचा तुटवडा असल्यामुळे डोस वाया जाऊ नयेत या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे आरोग्य मंत्री सोफिया चॅन यांनी सांगितले. हाँगकाँगने बायोएन्टेक-फायझर आणि चीनच्या सिनोव्हॅक या कंपन्यांशी करार केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT