ग्लोबल

अफ्रिकन देश काँगोमध्ये दहशतवादी हल्ला; कमीतकमी 60 जणांची हत्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आफ्रिकी देशातून मोठी बातमी येत आहे. काँगोमधील विस्थापित लोकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये कमीतकमी 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये लोकांची धारदार शस्त्राने हत्या केली गेली आहे. याबाबतची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. एका स्थानिक एनजीओच्या प्रमुखाच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे. ही घटना इटुरी प्रांतात घडली आहे. देशाच्या पूर्व भागात हा प्रांत आहे. या ठिकाणी मे 2021 पासून सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. (Democratic Republic of Congo)

पूर्वेकडील डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये (Democratic Republic of Congo - DRC) विस्थापितांच्या शिबिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 60 लोक ठार झाले आहेत. एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुखाने याबाबतची माहिती दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा भाग खनिज संपन्न आहे तसेच त्या ठिकाणी सशस्त्र समूह खुलेआम शस्त्रे घेऊन फिरताना दिसतात. यांच्याशी दोन हात करण्यासाठीच त्या ठिकाणी अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले आहेत. या ठिकाणी हिंसक बाबींवर लक्ष ठेवणाऱ्या किवू सिक्टोरिटी ट्रॅकरने ट्विटरवर सांगितलं की, काल रात्रीपासून जुगु भागात प्लेन सावोमध्ये कमीतकमी 40 नागरिकांची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. आतापर्यंत कुणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाहीये. मात्र, केएसटीचं म्हणणं आहे की या हल्लामागे स्थानिक दहशतवादी गटांचा हात असण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 4 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी

KL Rahul : ही काही मोठी गोष्ट नाही... केएल अन् गोयंका वादावर अखेर लखनौनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

GT vs KKR Live Score IPL 2024 : धुळीचं वादळ अन् जोरदार पाऊस गुजरातच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फिरवणार?

SCROLL FOR NEXT