ग्लोबल

संघात निवड झाली नसल्याने क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, पाकमध्ये खळबळ

आम्हाला तो त्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये बेशेद्ध अवस्थेत आढळून आला

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानच्या क्रीडा विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आंतरशहर चॅम्पियनशिपसाठी संघात निवड झाली नसल्यानं एका खेळाडूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शोएब असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव आहे. सध्या शोएब रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तान येथील दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद येथील देशांतर्गत वेगवान गोलंदाज शोएबने आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शोएबच्या कुटुंबातील एका सदस्याच्या माहितनुसार, चॅम्पियनशिपच्या चाचण्यांनंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. नैराश्यातून त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. आम्हाला तो त्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये बेशेद्ध अवस्थेत आढळून आला. यावेळी त्याने स्वत:चे मनगट कापून घेतलेले दिसले. त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

शोएब बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडला होता. आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातील एका खासगी रूग्णालयाच शोएब यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup : एका राजाने निवडला संघ... खेळाडूंवरील गुन्हे माफ अन् इंग्लिश तेल कंपनी बंद पाडण्याची धमकी; १९३० च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा तुम्ही ऐकला नसेल...

Donald Trump Team Split: इराण करारावरून ट्रम्प यांच्या प्रशासनात फूट; सीआयएच्या गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

Broiler Chickens Death : एका रात्रीत पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यु; सुमारे सात लाखाचे नुकसान, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Jawan Pravin Avhade : कन्यारत्नाच्या आनंदावर विरजण; जवान प्रवीण आव्हाड यांचे अपघाती निधन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेच्या २४ उमेदवारांना नोटीस, निवडणुकीचा हिशोब न दिल्याने कारवाई

SCROLL FOR NEXT