mehul choksi
mehul choksi 
ग्लोबल

मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा प्रयत्न फसला?

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात बेकायदा प्रवेश केल्याबद्दल डॉमिनिकामध्ये (Dominica) अटकेची कारवाई झालेला पीएनबी घोटाळ्यातील (PNB Fraud) आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Chauksi) याला भारतात आणण्याचे भारताचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. कारण डॉमिनिकानं चोक्सीला अँटिग्वाकडे (Antigua) सोपवणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, दिवसभरात यासंदर्भात येत असलेल्या माहितीवरुन भारत-डॉमिनिकाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं चोक्सीचं लवकरच भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकेल असं बोललं जात होतं. (attempt to bring Mehul Choksi to India failed Dominicas decision caused a stir)

पीएनबी घोटाळ्यातील दुसरा प्रमुख आरोपी असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला आहे. त्यानं भारताचं नागरिकत्व सोडलं असून अँटिग्वाचं नागरिकत्व धारणं केलं आहे. बुधवारी चोक्सीला डॉमिनिका देशातून बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याला आता परत अँटिग्वाकडे पाठवण्यात येणार असल्याचं डॉमिनिकाच्या मिनिस्ट्री ऑफ नॅशनल सिक्युरिटी आणि होम अफेअर्सनं म्हटलं आहे.

दरम्यान, काही काळापूर्वी आलेल्या बातम्यांनुसार अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी डॉमिनिकाच्या पंतप्रधानांना सूचना केली होती की, "भारताला हवा असलेला पीएनबी घोटाळ्यातील मास्टरमाईंड मेहुल चोक्सीला थेट भारताच्या स्वाधिन करावं."

चोक्सीला भारतात पाठवता येऊ शकत नाही

मेहुल चोक्सीला थेट भारतात आणण्यात येणार का? या प्रश्नावर चोक्सीचे वकील विजय अगरवाल यांनी सांगितलं की, "भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार, मेहुल चोक्सीनं अँटिग्वाचं नागरिकत्व घेतलं आहे. तर भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. इमिग्रेशन आणि पासपोर्ट अॅक्टनुसार चोक्सीला केवळ अँटिग्वालाच परत पाठवता येऊ शकतं."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT