QUAD countries Esakal
ग्लोबल

QUAD : बायडन यांच्यामुळे मोदींची ऑस्ट्रेलिया वारी हुकणार? सिडनीमधील क्वाड बैठक रद्द

क्वाड बैठक रद्द झाल्यामुळे या चार देशांच्या प्रमुखांची भेट आता जी-७ परिषदेमध्ये होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणारी क्वाड राष्ट्रांची बैठक रद्द करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी याबाबत घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) हे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अँथनी यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार होते.

क्वाड राष्ट्रांमध्ये (Quad Meeting) जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांचा समावेश होतो. इंडो-पॅसिफिक क्षेत्र हे 'मुक्त, स्पष्ट आणि समृद्ध' रहावे यासाठी हा समूह कार्यरत आहे. बायडन यांचा दौरा रद्द झाल्यानंतर अल्बानीज यांनी भारत आणि जपानशी चर्चा सुरू होती. अखेर, अँथनी यांनी सर्वांची माफी मागत ही बैठक रद्द (Quad Meeting Cancelled) झाल्याचे जाहीर केलं.

दरम्यान, भारत आणि जपानच्या पंतप्रधानांनी क्वाडची तारीख बदलून लवकरात लवकर ही बैठक आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे. याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही अँथनी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

बायडन दुसऱ्या संकटात

सध्या जो बायडन हे अमेरिकेतील आर्थिक संकट सोडवण्यात व्यग्र आहेत. डेब्ट सीलिंग निगोशिएशनमुळे बायडन यांनी आपले काही विदेश दौरे रद्द केले आहेत. त्यामुळे क्वाड बैठकीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये (Sydney Quad Meeting) उपस्थित राहणे त्यांना शक्य होणार नाही.

मोदींचा दौरा शक्य

क्वाड बैठकीसाठी पंतप्रधान मोदी (PM Modi Australia Visit) पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होते. आता बैठक रद्द झाल्यामुळे त्यांच्या या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, भारतासोबत होणारी द्विपक्षीय बैठक अजूनही शक्य असल्याचे ऑस्ट्रेलियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत भारत लवकरच निर्णय घेईल.

जी-७ परिषदेला येणार एकत्र

क्वाड बैठक रद्द झाल्यामुळे या चार देशांच्या प्रमुखांची भेट आता जी-७ परिषदेमध्ये (G7 summit) होणार आहे. १९ ते २१ मे पर्यंत जपानच्या हिरोशिमा शहरात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पंतप्रधान मोदींना या परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदी यावेळी परिषदेला संबोधित करतील. या परिषदेला ऑस्ट्रेलिया आणि अन्य काही राष्ट्रांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

Yavatmal: पीककर्ज वाटपाची गती मंदावली; आतापर्यंत 21 टक्के वाटप; दोन हजार 200 कोटीचे उदिष्ट

SCROLL FOR NEXT