Baltimore Key Bridge 
ग्लोबल

Video Viral: अमेरिकेत मोठी दुर्घटना! जहाज धडकल्याने ब्रिज कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली

Baltimore Key Bridge collapse: व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही मोठी दुर्घटना असून अनेक वाहने पाण्यात पडल्याची माहिती आहे

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज एक जहाज धडकल्याने कोसळले आहे. मेरीलँड ट्रान्सपोर्ट ऑथेरेटिने यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही मोठी दुर्घटना असून अनेक वाहने पाण्यात पडल्याची माहिती आहे. (Baltimore Key Bridge collapse vehicles fall into water after being hit by ship)

अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार 1:35 a.m. वाजता ही दुर्घटना घडली आहे. काही सेकंदामध्येच ब्रिज कोसळला आहे. अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच लोकांना वेगळ्या मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. माहितीनुसार, अनेक वाहने पाण्यात पडली आहेत. सिंगापूरचा झेंडा असलेले ३०० मीटर लांबीचे जहाज ब्रिजला धडकले होते.

अपघातामधील जीवितहानीची माहिती मिळू शकलेली नाही. बाल्टिमोरच्या महापौरांनी सांगितलं की, त्यांना अपघाताची माहिती मिळाली आहे. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. काही कर्मचारी देखील पाण्यात पडल्याची माहिती आहे.

बाल्टिमोर बचावकार्य विभागाचे प्रमुख केविन कार्टव्राईट यांनी सांगितलं की, कमीतकमी सात लोक पाण्यामध्ये पडले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. ९११ वर आम्हाला आपात्कालीन फोन आला होता. ज्यावेळी जहाज धडकले त्यावेळी अनेक वाहने ब्रिजवरती होती. सध्या लोकांना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. किती जीवितहानी झाली हे आत्ताच सांगता येणार नाही. पण, दुर्घटना मोठी आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT