Rising Religious Violence Against Hindus in Bangladesh
esakal
Rising Religious Violence in Bangladesh : बांगलादेशात दिवसेंदिवस अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या आणि हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. दररोज एका हिंदू व्यक्तीची हत्या होत असल्याचे दिसत आहे. यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्यांकाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंधातही तणाव वाढला आहे. एवढंच नाहीतर बांगलादेशातील हिसंक घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही टीका टिप्पणी सुरू आहे
मात्र तरीही बांगलादेशातील हिंसक घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. गुरुवारी (८ जानेवारी) सुनामगंज जिल्ह्यात आणखी एका हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मृताचे नाव जॉय महापात्रो असे आहे. तर या तरूणाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, स्थानिकांनी प्रथम त्याच्यावर क्रूरपणे हल्ला केला आणि नंतर त्याला विष प्राशन करण्यास भाग पाडले.
या हल्ल्यानंतर जॉय महापात्रो यास गंभीर अवस्थेत रूग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याआधी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशातील नरसिंगडी जिल्ह्यात एका हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली होती.
शिवाय याआधी बांगलादेशातील जशोर जिल्ह्यातील मणिरामपूरम येथील कोपलिया बाजार परिसरात कट्टरपंथीयांनी राणा प्रताप नावाच्या हिंदू पत्रकाराची भरदिवसा निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या केली होती. ही धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.