beirut
beirut 
ग्लोबल

Beirut Blast: सहा वर्षे होता अमोनियम नायट्रेटचा साठा; जाणून घ्या कशासाठी वापरतात

सकाळ वृत्तसेवा

बैरुत - लेबनॉनची राजधानी बैरुत शक्तशाली स्फोटांनी हादरली आहे. स्फोट इतका भीषण होता की शहरातील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. याशिवाय स्फोटामुळे 78 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये 4 हजार लोक जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. स्फोटाचं केंद्र बैरुतमधील एक पोर्ट आहे. पोर्टवर असलेल्या वेअर हाऊसमध्ये हा स्फोट झाला. 

गेल्या सहा वर्षांपासून या वेअरहाउसमध्ये जप्त करण्यात आलेलं अमोनियम नायट्रेट ठेवण्यात आलं होतं. स्फोटानंतर लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी सांगितलं की, हे एक धोकादायक वेअरहाउस आहे. 2014 मध्ये ते तयार करण्यात आलं होतं. या प्रकरणी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई कऱण्यात येईल असंही सांगितलं आहे. 

तब्बल 2750 टन स्फोटकं असुरक्षित कशी ठेवली?
लेबनॉनचे राष्ट्रपती मिशेल आउन म्हणाले की,'अमोनियम नायट्रेटचा इतका मोठा साठा असुरक्षित पद्धतीने कसा ठेवला जाऊ शकतो? ही बाब न पटणारी आहे. स्वीकारता येणार नाही.' वेअरहाउसमध्ये जवळपास 2750 टन अमोनियम नायट्रेट होतं. बैरुतमध्ये झालेला स्फोट इतका जबरदस्त होता की त्याचा हादरा 240 किमी पर्यंत जाणवला. 

कशासाठी वापरतात अमोनियम नायट्रेट
अमोनियम नायट्रेट हे गंध नसलेलं रसायन आहे. याचा अनेक कामांसाठी वापर केला जातो. मात्र सर्वाधिक वापर दोन गोष्टींमध्ये होतो. त्यात एक शेतीसाठी खतांमध्ये आणि दुसरा बांधकाम किंवा खाणकामात स्फोट करण्यासाठी. स्फोटक पदार्थ असलेल्या अमोनियम नायट्रेटला आग लागल्यास स्फोट होतो. आग लागल्यानंतर त्यातून धोकादायक असा गॅस निघतो. ज्यामध्ये नायट्रोजन ऑक्साइन आणि अमोनिया गॅसचा समावेश असतो. 

जगभरातील घडामोडींसाठी येथे क्लिक करा

साठा करण्यासाठी नियम
अमोनियम नायट्रेट साठवण्यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. ज्वलनशिल रसायन असल्यानं जिथं याचा साठा करायचा आहे ते पूर्ण फायरप्रूफ असणं गरजेचं आहे. तिथं कोणताही नाला किंवा गटार असू नये ज्यामध्ये अमोनियम नायट्रेट जमा होईल. लेबनॉनमधील स्फोटानंतर आता तपास केला जात आहे की वेअर हाउसमध्ये ठेवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटला आग कशी लागली?

याआधीही अमोनियम नायट्रेटचे स्फोट
जगात याआधीही अमोनियम नायट्रेटमुळे अनेक दुर्घटना झाल्या आहेत. अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका फर्टिलायझर प्लांटमध्ये 2013 साली स्फोट झाला होता. त्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता. 2001 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या स्फोटात 31 जणांनी जीव गमावला होता. अमेरिकेत 1995 मध्ये ओकलाहोमा इथं झालेल्या स्फोटांमध्येही अमोनियम नायट्रेट सापडलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT