ग्लोबल

काश्मीरचा पॅलेस्टाईन होतोय म्हणणाऱ्या रशियन माध्यमाला रशियानंच झापलं; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ‘काश्‍मीर म्हणजे भविष्यातील पॅलेस्टाइन आहे,’ असा रशियातील माध्यमांनी काढलेला निष्कर्ष रशिया सरकारने अमान्य केला आहे. तसेच, काश्‍मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय मुद्दा असल्याची आपली भूमिका अद्यापही कायम असल्याचेही रशियाने स्पष्ट केले आहे. (Russia)

रशियातील ‘रेडफिश’ डिजिटल मीडियाने काही दिवसांपूर्वी काश्‍मीरवर बनविलेल्या एका माहितीपटाचा ट्रेलर ट्विट करत ‘भविष्यातील पॅलेस्टाइन’ (Kashmir as another Palestine) असे त्याखाली लिहिले. ‘रेडफिश’ मीडिया हे रशिया सरकारचे ट्विटरवरील प्रवक्ते असल्याचे समजले जाते. त्यामुळेच रशियाच्या दिल्लीतील दूतावासाने आज याबाबत स्पष्टीकरण दिले. ‘काश्‍मीर प्रश्‍नाबाबत रशियाची हस्तक्षेप न करण्याची भूमिका कायम आहे,’ असे या दूतावासाने निवेदन प्रसिद्ध करत सांगितले. तसेच, ‘रेडफिश’चा आणि रशिया सरकारचा काहीही संबंध नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबतचा उपाय जो आहे तो 1972चा सीमला करार आणि 1999 च्या लाहोर घोषणेनुसार उभय देशांकडूनच शोधला गेला पाहिजे, असंही सांगण्यात आलंय. दूतावासाने असंही म्हटलंय की, ट्विटरवर 'रशियाचे प्रवक्ते' म्हणून समजलं जाणारं चॅनेलचं हे लेबल "भ्रामक" आहे. ते रशियाशी अधिकृतरित्या निगडीत नाही. हे चॅनेल संपादकीय धोरणाच्या संदर्भात स्वतंत्रपणे कार्य करते. मात्र, त्यावरुन संतुलित प्रतिक्रिया दिल्या जातील, अशी आशा आहे, असं दूतावासाने म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav ने मला खूप मेसेज केले होते...' बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा; नेमकं काय म्हणाली?

VIRAL VIDEO : एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये धक्कादायक घटना; मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशांवर केली लघवी, लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जामोद येथून बदली झालेल्या शिक्षकांच्या रुजूकरणासाठी ठिय्या आंदोलन...

Air India Express Offers : नववर्षाची विमान प्रवाशांसाठी मोठी ऑफर! Air India Express ची Pay-Day Sale सुरू; तिकिटांवर बंपर सवलत

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

SCROLL FOR NEXT