Bill Gates hails PMs leadership in effort to contain Covid 
ग्लोबल

Coronavirus : बिल गेट्स यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असणारे बिल गेट्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पत्र लिहून कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी जी पावलं उचलत आहे, ती अत्यंत प्रंशसनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने जी पावलं उचलली आहेत त्याचं आणि तुमच्या नेतृत्वाचं मी खरंच कौतुक करतो. देशातील हॉटस्पॉट ओळखून कोरोना बाधित रुग्णांना क्वारंटाइन करणं, लॉकडाउन जाहीर करणं, आरोग्य यंत्रणेला पाठींबा देण्यासाठी उचललेली पावलं हे प्रशंसनीय आहे, असे बिल गेट्स यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.


आरोग्य सेतू अॅपचेही कौतुक
रिसर्च आणि डेव्हलपमेंट यासोबतच डिजीटल इनोव्हेशन या गोष्टीवरही सरकारने चांगला भर दिला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकार डिजीटल प्रणालीचा योग्य वापर करत आहे याचं मला कौतुक आहे. कोरोना विषाणूसंदर्भात सर्व वैद्यकीय सुविधेची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आरोग्य सेतू अ‍ॅप, त्यावर करोना बाधित क्षेत्राची मिळणारी माहिती या सर्व गोष्टी दाद देण्यासारख्या आहेत, असेही गेट्स यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं होतं. याव्यतिरीक्त देशात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आणि प्रादूर्भावही काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. सर्व राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT