ग्लोबल

बिल गेट्स -मेलिंडा कायदेशीररित्या विभक्त; 27 वर्षांचा संसार मोडला

यापुढे आम्ही एकमेकांसोबत राहू शकत नाहीत, असं कारण त्यांनी दिलं आहे.

स्वाती वेमूल

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स Bill Gates आणि त्यांची पत्नी मेलिंडा Melinda हे दोघं आता कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्याच्या तीन महिन्यांनंतर बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला आहे. २७ वर्षे एकमेकांसोबत संसार केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. यापुढे आम्ही एकमेकांसोबत राहू शकत नाहीत, असं कारण त्यांनी दिलं आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात मोठी खासगी चॅरिटेबल संस्था ते चालवतात आणि यासाठी ते यापुढेही एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टनमधील न्यायालयात सोमवारी घटस्फोटाच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या. घटस्फोटानंतर कोणत्याही पक्षाला जोडीदाराकडून पोटगी मिळणार नाही अथवा त्यांची नावे बदलणार नाहीत असं त्यात नमूद केलं आहे. न्यायाधीशांनी विभक्त होण्याच्या करारानुसार गेट्स यांना संपत्ती विभाजित करण्याचे आदेश दिले आहेत. वॉशिंग्टनमधील कायद्यानुसार, घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर निर्णय अंतिम करण्यापूर्वी ९० दिवसांचा कालावधी दिला जातो.

'खूप चर्चा आणि नात्यासंबंधी विचार केल्यानंतर आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या २७ वर्षात तीन मुलांचं संगोपन करत त्यांना मोठं केलं. तसेच जगभरातील लोकांना निरोगी आणि चांगलं आयुष्य जगता यावं, अशा संस्थेचीही स्थापना केली,' असं बिल गेट्स यांनी ट्विटरवर म्हटलं होतं.

बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांची १९८७ मध्ये पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या. १९९४ मध्ये या दोघांनी हवाईच्या लानी बेटावर लग्न केले होते. असं म्हणतात की, तेथील गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी बरीच हेलिकॉप्टर भाडे तत्वावर घेतली होती. बिल गेट्स हे पूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचे ते मालक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT