मॉन्ट्रियल (कॅनडा) - कोरोना, लॉकडाउनच्या काळात अनेकांना स्वविलगीकरणात राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॅनडातील मॅक गिल विद्यापीठाने एकटेपणामुळे मेंदूत होणाऱ्या बदलांवर संशोधन केले आहे. यातून सामाजिक विलगीकरणाला मज्जासंस्था कशी प्रतिसाद देते, हेही अधोरेखित झाले आहे. संशोधकांनी विलगीकरणाचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्घ झाले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संशोधकांच्या पथकाने जवळपास ४० हजार मध्यमवयीन व्यक्तींचा एमआरआय, अनुवंशिकता आदींचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे, त्या व्यक्तींना स्वत:ची मानसिक मूल्यमापन चाचणीही करायला लावली. या व्यक्तींमध्ये ब्रिटनमधील युके बायोबॅंकच्या प्रौढ स्वयंसेवकांचाही समावेश होता. त्यानंतर संशोधकांनी सहभागींपैकी एकटेपणाची भावना जाणवणाऱ्यांच्या एमआरआयची इतर एकटेपणा न जाणवणाऱ्या सहभागींच्या एमआरआयशी तुलना केली. यावेळी संशोधकांना एकटेपणा जाणवणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये अनेक प्रकारचे बदल झाल्याचे दिसले. यात मेंदूच्या डिफॉल्ट नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात हे बदल केंद्रित झाले होते. मेंदूतील हा भाग भविष्याचे नियोजन, इतरांबद्दलचा विचार, कल्पना, भूतकाळातील आनंददायक गोष्टींचे स्मरण आदी गोष्टींशी संबंधित असतो. मात्र, एकटेपणाचा मेंदूवरील परिणाम समजून घेण्यास आत्ताच सुरवात झाली आहे. याबाबत अधिक व्यापक संशोधनाची गरजही संशोधकांनी व्यक्त केली. जगभरातील आरोग्य क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञांना हे संशोधन व डाटा मुक्तपणे उपलब्ध आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मेंदूत कोणते बदल आढळले?
एकटेपणा जाणवणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूतील ‘डिफॉल्ट नेटवर्क’ इतरांपेक्षा एकमेकांशी अधिक घट्टपणे जोडले गेले होते. त्यातील ‘ग्रे मॅटर’ चा आकारही इतर व्यक्तींपेक्षा मोठा असल्याचे एमआरआय मध्ये दिसले. एकटे राहणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूतील एकमेकांशी जोडलेल अंतर्गत मज्जातंतूचे जाळे (न्यूरॉन सिग्नेचर) इतरांपेक्षा वेगळे असल्याचे संशोधकांना आढळले. त्यासाठी त्यांनी मेंदूतील विविध भागांच्या आकारांचा व ते मेंदूत एकमेकांशी कसे संपर्क साधतात, याचाही आधार घेतला.
जगभरात एकटेपणा ही आरोग्यावर परिणाम करणारी प्रमुख समस्या बनली आहे. एकटेपणाचा अनुभव घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींना स्मृतीभ्रंशासारख्या आजाराचाही अधिक धोका असतो. एकटेपणाचा मेंदूवर नेमका कसा परिणाम होतो, हे समजून घेतल्यास मज्जासंस्थेशी संबधित आजारांना रोखण्यात व अधिक चांगल्या उपचारासाठी फायदा होऊ शकतो.
नाथन स्प्रेंग, संशोधक, मॅक गिल विद्यापीठ, कॅनडा.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.