Yehiyeh Sinwar, Hamas Chief File Photo
ग्लोबल

'हमास' प्रमुखाच्या घरावर बॉम्ब हल्ले; इस्रायलची मोठी कारवाई!

खान युनिस शहरात आपल्या साथिदारांसह 'तो' लपून बसला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास (Israel and Hamas) यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होत चालला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या कारवाईमध्ये इस्रायलने आज सातव्या दिवशी मोठं पाऊल उचललं आणि हमासचा प्रमुख येहाया सिनवार (Yehiyeh Sinwar) याच्या घरावर बॉम्ब हल्ले केले. मात्र, या हल्ल्यांमध्ये सिनवारच्या घराचं किती नुकसान झालंय? याबाबत माहिती कळू शकलेली नाही. येहाया सिनवार हा गाझा पट्टीत दक्षिण भागात वसलेल्या खान युनिस शहरात आपल्या साथिदारांसह लपून बसला आहे. (Bombing on Hamas leaders home Israels big action)

इस्रायल आणि अमेरिकेसह जगातील इतर देश हमासला दहशतवादी संघटना मानतात. सोमवारपासून या संघटनेविरोधात सुरु झालेल्या लढाईत आजवर हमासचे २० सदस्य ठार झाले आहेत. तर हमासने इस्रायलवर २००० हून अधिक रॉकेट डागले आहेत.

२०१४ नंतरचं सर्वात मोठं युद्ध

सन २०१४ मध्ये गाझा युद्धानंतर सध्या आजवरचा सर्वात मोठा संघर्ष सुरु आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या या संघर्षात गाझामध्ये १४५ पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले आहेत. ज्यामध्ये ४१ लहान मुलं आणि २३ महिलांचा समावेश आहे. तर एका पाच वर्षांच्या मुलासह एक सैनिक आणि आठ इस्रायली नागरिक मारले गेले आहेत.

जाणून घ्या कोण आहे हमास प्रमुख येहाया सिनवार?

येहाया सिनवारचा जन्म खान युनिस शहरातील एका रेफ्युजी कँपमध्ये झाला. त्यानं याच शहरातील एका शाळेत शिक्षण घेतलं त्यानंतर उच्च शिक्षणासाठी इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझामध्ये प्रवेश घेतला. इस्रायलप्रती त्याच्या मनात सुरुवातीपासूनच विष पसरवलं गेलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो इस्रायलविरोधी कारवायांमध्ये सामिल झाला होता. दरम्यान, त्याला बऱ्याचदा अटकही झाली होती. तुरुंगात गेल्यानंतर त्याची आणखी कट्टरवाद्यांसोबत ओळख झाली आणि तो या दहशतवादी संघटेनत ओढला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT