borana 
ग्लोबल

आफ्रिकन जमातीचा विचित्र नियम; परपुरुषाशी पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास असते संमती

सकाळन्यूजनेटवर्क

आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या काही आदिवासी जमातीमध्ये काही विचित्र प्रथा आणि नियम असतात. यामध्ये सगळ्यात हैराण करणारी ओरोमा आदिवासी जमात आहे. या समुदायाच्या महिलांना विवाहेत्तर शारीरिक संबंध ठेवण्याची केवळ परवानगीच असते असं नाही, तर त्याचे समर्थनही केले जाते. 'नवभारत टाईम्स'ने जियोफिजिस्ट रत्नेश पांडे यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 

ओरोमा लोकांना बोराना असंही म्हटलं जातं. हे लोक इथियोपियाच्या दक्षिण ओरोमियाच्या बोरेना जोन, सोमालियाच्या सीमावर्ती जोन आणि उत्तर केन्यामध्ये राहतात. बोराना लोक गड्डा प्रणाली अनुसार आपलं जीवन जगतात. त्यांच्या जीवनात तेथील सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो. या लोकांची स्वतंत्र लोकतांत्रिक प्रणाली आहे. याअंतर्गत ते राजनैतिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती नियंत्रित करतात. 

मुस्लिम व्यक्तीने हनुमान मंदिरासाठी दान केली जमीन

या समुदायातील महिलांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. विवाहित महिला आपल्या पतीशिवाय अन्य पुरुषासोबतही शारीरिक संबंध ठेवू शकतात. महिलेच्या या निर्णयाचा सन्मान केला जातो आणि संपूर्ण समुदाय याचे समर्थन करतो. पत्नी निश्चित करते ही तिच्या घरी कोण प्रवेश करेल आणि तिच्यासोबत शारीरित संबंध ठेवेल. अशावेळी पती घराजवळ आला आणि त्याने घराच्या बाहेर जमिनीत रुतलेले एक पान पाहिले, तेव्हा तो घरात प्रवेश करत नाही. जेव्हा परपुरुष बाहेर येऊन ते पान काढतो, त्यावेळीच पती आपल्या घरी जाऊ शकतो. 

ब्रिटननंतर अमेरिकेतील खासदारांचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

बोराना ओरोमा एक भटकी जमात आहे. ते उंट आणि इतर प्राण्यांना चारा मिळावा यासाठी भटकंती करतात. बोराना ओरोमा समुदायाचा पुरुष आपल्या जनावरांच्या झुंडीचे नेतृत्व करतो, तर बोराना महिला घराची जबाबदारी सांभाळतात. बोराना गाय, बकरी, शेळी, उंट असे प्राणी पाळतात. जेव्हा ते परंपरागत नृत्य करतात, तेव्हा कोणाच्या तरी घरी बाळ जन्माला आल्याचं समजलं जातं. हे लोक आपल्या बाळाचे नाव तीन वर्षांपर्यंत ठेवत नाहीत. 

बोराना ओरोमा समुदायातील मुलांनी जर किशोरावस्थेत हत्ती, सिंह, गेंडा, म्हैस अशा जंगली प्राण्यांची शिकार केल्यास त्यांना विशेष दर्जा प्राप्त होतो. अशा मुलांना बुद्धिमान समजलं जातं. अशाच मुलांना पुढे त्यांचा नेता म्हणून निवडलं जातं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT