Boris Johnson calls on UK to go back to work in plan to ease lockdown 
ग्लोबल

Coronavirus : ब्रिटनमध्ये 'या' तारखेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनमध्ये 1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. देशातील कोरोना संकटामुळे लॉकडाऊन त्वरित संपणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण, लॉकडाऊन सुलभ करण्यासाठी सरकार काही योजनांवर काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जॉन्सन म्हणाले, 'या आठवड्यात लॉकडाऊन संपवले जावू शकत नाही. त्याऐवजी आम्ही उपायांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पाऊलं उचलत आहोत. जे घरातून काम करू शकत नाहीत त्यांना सोमवारपासून कार्यालयात जाऊ दिले जाईल. बुधवारपासून लोकं व्यायाम आणि खेळ यासारख्या उपक्रमांसाठी बाहेर जाऊ शकतील, परंतु, त्यासाठी सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. 'तुम्ही तुमच्या स्थानिक उद्यानात उन्हात बसू शकता, तुम्ही गाडी चालवू शकता आणि इतर कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही खेळ खेळू शकता पण, फक्त तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह या गोष्टी करण्याची परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात सिंहगड रस्त्यानं दाखवला संयम; रोखला कोरोनाचा राक्षस

दरम्यान, पंतप्रधानांनी पाच स्तरीय अ‍लर्ट सिस्टम ठेवली आहे. ज्याचा उपयोग वैज्ञानिक डेटाद्वारे व्हायरसच्या प्रसाराच्या प्रमाणावर नजर ठेवण्यासाठी सरकार करणार आहे. आपल्या अलर्ट सिस्टमच्या 'लेव्हल' विषयी बोलताना जॉन्सन म्हणाले, 'लेव्हल १ चा अर्थ असा आहे की हा आजार ब्रिटनमध्ये अस्तित्त्वात नाही. लेव्हल ५ सर्वात गंभीर आहे. लॉकडाऊन दरम्यान आम्ही लेव्हल ४मध्ये आलो आहोत आणि सर्वांचे धन्यवाद. कारण आता आपण लेव्हल ३मध्ये प्रवेश करण्याच्या स्थितीत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Intercity: पुणे-मुंबई इंटरसिटीच्या डबे वाढवण्याला ‘ब्रेक’; फलाट आणि पिट लाइन अपुरी, प्रवाशांना नाहक फटका

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात याल, तर दरोडेखोरांप्रमाणेच वागणूक देऊन चोप देऊ; राजू शेट्टींचा थेट इशारा

AI Healthcare Breakthrough: जगात पहिल्यांदाच AIच्या मदतीने मेंदूची शस्त्रक्रिया; रुग्णाची दृष्टी वाचवण्यात यश

Marathi News Live Updates : पंकजा मुंडे, आदिती तटकरे यांनी बांधली धनंजय मुंडेंना राखी; भावाने दिला आशीर्वाद

BJP woman leader daughter in law : भाजप महिला नेत्याच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी, विवाहबाह्य संबंधांचा आरोप

SCROLL FOR NEXT