Bus accident

 

esakal

ग्लोबल

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

15 dead in Bus accident : राँग साइडने चालवली जात होती बस; मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश तर अनेकजण जखमी

Mayur Ratnaparkhe

Brazil Bus Accident News : ब्राझीलमधील पेर्नम्बुको येथे शनिवारी झालेल्या एका  भीषण रस्ते अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व ब्राझीलमधील महामार्गावर चुकीच्या दिशेने बस चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकावर आदळली आणि उलटली, यामुळे मोठा अपाघात घडला. ही बस बाहिया राज्यातून निघाली होते आणि शेजारच्या पेर्नम्बुको राज्यातील सालोआ येथे हा अपघात झाला.

प्राप्त माहितीनुसार बसमध्ये ३० प्रवासी होते, त्यापैकी ११ महिला आणि चार जणांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले की, चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे आणि तो मद्यपान करून वाहन चालवत नव्हता. मात्र अधिक चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की अपघाताच्या वेळी काही प्रवाशांनी सीट बेल्ट घातले नव्हते अशीही माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, तर अपघातात जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्राझीलच्या वाहतूक मंत्रालयाच्या मते, २०२४ मध्ये रस्ते अपघातात दहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. एप्रिलमध्ये, आग्नेय ब्राझीलमध्ये प्रवासी बस उलटल्याने दोन मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीमध्ये, साओ पाउलो राज्यातील एका महामार्गावर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली, ज्यामध्ये १२ प्रवासी मृत्युमुखी पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत होणार बदल, 'असे' असेल स्वरुप

MLA Monica Rajale: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २०८ कोटी मंजूर: आमदार मोनिका राजळे; दिवाळीपूर्वी रक्कम खात्यात वर्ग होणार

Karnataka Politics : ठरलं...! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे नेमकं काय म्हणाले...

प्रेमाची गोष्ट 2 मध्ये स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम घालणार धुमाकूळ ! रिलीजपूर्वीच जोडीची चर्चा

India Afghanistan relations: अफगाणिस्तानातील भू-राजकीय वर्चस्वाच्या लढाईत भारताची भूमिका

SCROLL FOR NEXT