Brazil President Threatens WHO Exit As Coronavirus Kills A Brazilian Per Minute 
ग्लोबल

अमेरिकेनंतर आणखी एका देशाचा जागतिक आरोग्य संघटनेला विरोध 

वृत्तसंस्था

ब्राजिलिया : अमेरिकेनंतर आणखी एका देशाने जागतिक आरोग्य संघटनेला विरोध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला देत असलेला निधी बंद करत असल्याची घोषणा केल्यानंतर आता ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनीही दंड थोपटले आहेत. ब्राझीलला जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळं करण्याची धमकी बोल्सोनारो यांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना व्हायरसच्या प्रसारावरुन जागतिक आरोग्य संघटनेकडे संशयाने बघितलं जात आहे. ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एवढंच नाही तर शुक्रवारी कोरोनामुळे ब्राझीलमध्ये १,४७३ जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात सर्वाधिक मृत्यू होण्याच्या बाबतीत ब्राझीलने इटलीला मागे टाकलं आहे. रोज होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूंच्या बाबतीत ब्राझील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. ब्राझीलच्या वृत्तपत्रांमध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊनचे नियम शिथील करू नका, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. ब्राझीलमधली ही परिस्थिती चिंताजनक असल्याची प्रतिक्रियाही जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
-----------
जी सेव्हनवरून चीनचा भारताला इशारा; अमेरिकेचा हा डाव असल्याचे मत
-----------
पुजारी करतायेत सॅनिटायझर वापरायला विरोध; कारण, वाचून व्हाल चकित
------------
जागतिक आरोग्य संघनेच्या या प्रतिक्रियेवर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी टीका केली असून जागतिक आरोग्य संघटना जर पक्षपाती राजकीय संघटना बनणार असेल, तर ब्राझील जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडेल, असा इशारा जेयर बोल्सोनारो यांनी दिला. बोल्सोनारो यांच्या या इशाऱ्यावर अजून जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जेयर बोल्सोनारो यांच्यावर मास्क न घातल्यामुळे आणि कोरोना व्हायरसला गांभीर्याने न घेतल्यामुळे याआधी बरेच वेळा टीका करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात लोकतांत्रिक संस्थांना कमकुवत केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT