गांधीजींच्या स्मरणार्थ ब्रिटनमध्ये विशेष नाणे sakal
ग्लोबल

गांधीजींच्या स्मरणार्थ ब्रिटनमध्ये विशेष नाणे

नाण्यावर भारताचे राष्ट्रीय फुल असलेल्या कमळाचे चित्र असून गांधींजीचा संदेशही आहे.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : ब्रिटनचे चॅन्सलर ऋषी सुनक यांनी आज महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ एका पाच पौंडांच्या विशेष नाण्याचे अनावरण केले. या नाण्यावर भारताचे राष्ट्रीय फुल असलेल्या कमळाचे चित्र असून गांधींजीचा संदेशही आहे.

हिना ग्लोव्हर यांनी या नाण्याचे डिझाईन केले असून ते सोने आणि चांदीमध्येही उपलब्ध आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या या महान नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी हे नाणे प्रकाशित केले असल्याचे सुनक यांनी सांगितले. ‘मी एक हिंदू असल्याने दिवाळीच्या मुहुर्तावर या नाण्याचे प्रकाशन होणे ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ब्रिटनमध्ये प्रथमच गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध केले जात आहे,’ असे सुनक म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाणे प्रकाशित होणे महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच, भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंधही दृढ होत असल्याची ग्वाही यामुळे दिली गेली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

गांधीजींच्या या नाण्याची ऑनलाइन विक्री सुरु झाली असून दिवाळीनिमित्त देवी लक्ष्मीचा छाप असलेले एक आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे बारही ब्रिटन सरकारने जनतेला खरेदीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT