Putin and zelensky
Putin and zelensky  Team eSakal
ग्लोबल

पुतीन यांच्या धमकीला प्रत्युत्तर, युक्रेनला विध्वंसक शस्त्र देणार ब्रिटन

सकाळ डिजिटल टीम

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांना धमकी दिली आहे. धमकीच्या एका दिवसानंतर ब्रिटनने (Britain) जाहीर केले की, तो युक्रेनला रशियाचे हल्ले रोखण्यास मदत करण्यासाठी प्रगत संरक्षण सामुग्री देण्यास अमेरिकेबरोबर सहभागी होईल. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वालेस म्हणाले, जशी रशियाची रणनीती बदलते त्या प्रमाणेच युक्रेनला (Ukraine) आम्ही मदत करु. युक्रेनियन सैनिकांना नवीन लाँचर्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, असे वालेस यांनी सांगितले. (Britain Give Multi Launch Rocket System To Ukraine)

वास्तविक ब्रिटनने युक्रेनला अत्याधुनिक एम २७० राॅकेट लाँचर देण्याचे जाहीर केले आहे. या राॅकेट लाँचरची मारक क्षमता ८० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. ब्रिटनने रशियावर सुरु केलेल्या हल्ल्यांपासूनच ब्रिटनने युक्रेनला मदत केली आहे. युक्रेनला अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स त्या देशाने पाठविले होते. युक्रेनला ब्रिटनचा पाठिंबा नेहमीच राहिल, असे वालेस यांनी सांगितले.

सध्या ब्रिटिश लष्कर युक्रेनियन सैनिकांना रणगाडे चालविण्याचे प्रशिक्षण देत आहे. यापूर्वी अमेरिकेनेही युक्रेनला हार्पून अँटीशीप मिसाईल आणि एम १४२ हाय मोबिलिटी आर्टीलरी राॅकेट सिस्टिम देण्याचे जाहीर केले होते. अमेरिकेने युक्रेनला ७०० मिलियन डाॅलरची सुरक्षा साहाय्यता देण्याच्या योजनेचीही घोषणा केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT