Britain New PM Rishi Sunak esakal
ग्लोबल

Rishi Sunak : 'ब्रिटनचा पंतप्रधान लवकरच भारतीय वंशाचा होईल'; 7 वर्षांपूर्वी 'या' व्यक्तीनं केलं होतं भाकीत

ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनलेल्या ऋषी सुनक यांच्या भारतीय कनेक्‍शनची बरीच चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनलेल्या ऋषी सुनक यांच्या भारतीय कनेक्‍शनची बरीच चर्चा आहे.

Britain New PM Rishi Sunak : ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनलेल्या ऋषी सुनक यांच्या भारतीय कनेक्‍शनची बरीच चर्चा आहे. आता आणखी एक नवी माहिती समोर आलीय. फार कमी लोकांना माहित असेल की, ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांनी 7 वर्षांपूर्वी याची भविष्यवाणी केली होती.

कॅमेरून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Narendra Modi) झालेल्या चर्चेत म्हटलं होतं की, लवकरच भारतीय वंशाची व्यक्ती डाउनिंग स्ट्रीटवर पोहोचेल. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाला डाउनिंग स्ट्रीट असं म्हणतात. आता ही भविष्यवाणी खरी ठरली असून ऋषी सुनक यांना ही संधी मिळालीय. तेच ऋषी सुनक जे दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिझ ट्रस यांच्याकडून पराभूत झाले होते.

2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनला गेले होते, तेव्हा त्यांनी वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनही सहभागी झाले होते. तेव्हा कॅमेरून यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं की, तो दिवस फार दूर नाही, जेव्हा ब्रिटनचा पंतप्रधानही भारतीय असेल, असं म्हटलं होतं.

ऋषी सुनक हे गेल्या दोन शतकांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांचं वय केवळ 42 वर्षे आहे. त्यांचे आजी-आजोबा अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील रहिवासी होते. त्यांचे आजोबा प्रथम नैरोबी इथं स्थायिक झाले आणि तेथून ते ब्रिटनमध्ये पोहोचले. ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदी विराजमान होताच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करताना अनेक नेत्यांची हकालपट्टी केलीय. याशिवाय त्यांनी देशवासीयांना आगामी काळात कठीण निर्णयांसाठी तयार राहण्यास सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT