Queen Elizabeth II died Sakal Digital
ग्लोबल

Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचं निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ डिजिटल टीम

Queen Elizabeth II Died

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ यांना वयामुळे प्रवासास मर्यादा येत असल्यानेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांना बाल्मोराल कॅसल येथे बोलावून घेत त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपविली होती.

बकिंगहॅम पॅलेसने (Buckingham Palace) दिलेल्या माहितीनुसार राणी गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बऱ्या झाल्या होत्या. परंतु, त्यांना चालणे आणि उभे राहण्यात अडचणी येत होत्या. त्यातच गुरुवारी त्यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं होतं. विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर राणी वरिष्ठ राजकीय सल्लागारांसह पूर्वनियोजित बैठकीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.

राणी एलिझाबेथ या स्कॉटलंडमधील त्यांच्या बाल्मोराल कॅसल येथे राहत होत्या. वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. गुरुवारी त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर एलिझाबेथ यांचे पुत्र युवराज चार्ल्स, त्यांच्या पत्नी कॅमिला, नातू राजपुत्र विल्यम हे सर्व बाल्मारोल येथे गेले होते. अखेर गुरुवारी रात्री बकिंगहॅम पॅलेसने राणीचं निधन जाहीर केले.

सर्वाधिक काळ युकेच्या राजगादीवर विराजमान असलेली व्यक्ती म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय. राजे जॉर्ज सहावे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. १९३६ मध्ये आठवे एडवर्ड (ड्यूक ऑफ विंझर) यांनी राजत्याग केल्याने जॉर्ज सहावे यांना राजगादी मिळाली. ६ फेब्रुवारी १९५२ रोजी सहावे जॉर्ज यांचे निधन झाले. यानंतर एलिझाबेथ या गादीवर येणाऱ्या सहाव्या स्त्री सम्राज्ञी ठरल्या. २० नोव्हेंबर १९४७ मध्ये एलिझाबेथ यांचा विवाह युवराज फिलीप यांच्यासोबत झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

SCROLL FOR NEXT