King Charles III  Esakal
ग्लोबल

King Charles III : ब्रिटनला मिळणार नवा राजा; ७० वर्षानंतर होणार शाही सोहळा

राजे चार्ल्स तिसरे यांचा आज राज्याभिषेक

सकाळ डिजिटल टीम

राजे चार्ल्स तिसरे हे आज (ता.६) राज्याभिषेकानंतर ब्रिटनचे अधिकृत राजे जगभरात ओळखले जाणार आहेत. चार्ल्स यांचा राज्याभिषेक स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार) होणार आहे.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन ८ सप्टेंबरला २०२२ रोजी झाले. ब्रिटिश उत्तराधिकार कायद्यांनुसार कोणत्याही समारंभानुसार राजघराण्याचे सिंहासन त्यांचे पुत्र चार्ल्स यांच्याकडे आले आहे. ब्रिटिश कायद्यानुसार आधीचा राजा किंवा राणीच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी लगेचच राजा किंवा राणी बनतात. देशाला राजा किंवा राणी नाही, असे कधीही होत नाही.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर राज्याभिषेकाची अधिकृत प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरू झाली होती. त्यावेळी राजे चार्ल्स तिसरे यांची राजा म्हणून घोषणा करण्‍यासाठी सेंट जेम्स पॅलेसमध्ये राज्यारोहण परिषद बैठक झाली होती. ‘प्रिव्ही कौन्सिल’ नावाचा हा समारंभ नव्या राजाच्या पहिला अधिकृत समारंभ होता. चार्ल्स यांनी त्यावेळी स्कॉटलंडचे चर्च सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी उत्तर आयर्लंड आणि वेल्सच्या भेट देत राजा बनण्याच्या त्यांच्या विविध टप्प्यांना सुरुवात केली. ब्रिटिश क्राउनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर शोकाचा कालावधी संपल्यानंतर नव्या राजाचा अधिकृत राज्याभिषेक होतो. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पिता राजे जॉर्ज पाचवे यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. त्यानंतर १६ महिन्यांनी २ जून १९५३ एलिझाबेथ राजगादीवर विराजमान झाल्या होत्या.

शाही सोहळ्यातील पाहुणे

२,२०० पाहुणे उपस्थित राहणार

राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेक सुमारे आठ हजार पाहुण्यांच्या उपस्थित झाला होता

चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स हॅरी यांच्यासह राजघराण्यातील कुटुंब सोहळ्यात सहभागी होणार

अन्य देशांचे राजे, अध्यक्ष, मंत्र्यांनाही निमंत्रण

भारताकडून उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे प्रतिनिधित्व करणार

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन, चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग हेही सहभागी होण्याची शक्यता

अभिनेत्री सोनम कपूर, हॉलिवूड कलाकार टॉम क्रूझ, गायक टॉम जोन्स, रॉबी विल्यम्स यांच्यासह एल्टन जॉन, बेअर ग्रिल आदी निमंत्रित

ब्रिटनमध्ये राज्याभिषेक कसा होतो

राज्याभिषेकात सम्राटाच्या डोक्यावर औपचारिक पद्धतीने राजमुकुट ठेवला जातो

परंपरागत पद्धतीनुसार राज्याभिषेक हा एक संस्कार आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा विधी आहे

वेस्टमिनिस्टर ॲबे येथे गेल्या ९०० वर्षांपासून राज्याभिषेकाची प्रथा पाळली जाते

परंपरेनुसार ब्रिटनचे राजे आणि राण्यांना १०६६ मध्ये विल्यम द कॉन्करनंतर वेस्ट मिनिस्टर ॲबेमध्ये मुकुट परिधान केला जातो

राज्याभिषेकाचा खर्च

राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर १०२१.५ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज

सोहळ्याचा सर्व खर्च ब्रिटिश सरकार करणार

चार्ल्स यांच्या राज्याभिषेकावरील अंदाजे खर्च हा राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या १९५३ मधील राज्याभिषेकापेक्षा दुप्पट

तत्कालीन ब्रिटिश सरकारने सोहळ्यावर १५ लाख पाउंड खर्च केला होता. ही रक्कम आज ५२८.७ कोटी रुपये एवढी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

SCROLL FOR NEXT