Liz Truss Personal Life : भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून निवडणून आल्या आहेत. लिझ ट्रस यांचे आयुष्यदेखील खूप मनोरंजक आहे. सरकारी शाळेत शिकलेल्या 47 वर्षीय ट्रस यांचे वडील गणिताचे प्राध्यापक आणि आई नर्स होती. कामगार समर्थक कुटुंबातून आलेल्या ट्रस यांनी ऑक्सफर्डमधून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ अकाउंटंट म्हणूनही काम केले. त्यानंतर त्या राजकारणात आल्या. सुरूवातीला नगरसेवक म्हणून त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. ट्रस यांना उजव्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते. ट्रस 2010 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. ब्रिटीश मीडियात ट्रस यांची तुलना माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्याशी केली जाते.
लिझ ट्रस यांचे पूर्ण नाव मेरी एलिझाबेथ ट्रस असे आहे. त्यांचा जन्म 26 जुलै 1975 रोजी ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वडील जॉन केनेथ तर, आईचे नाव प्रिसिला मेरी ट्रस असे होते. ट्रस यांचे वडील लीड्स विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर आई परिचारिका होती. ट्रस चार वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब स्कॉटलंडला स्थायिक झाले येथे त्यांनी सुरुवातीचे शिक्षणाचे धडे घेतले. त्यानंतर काही वर्षांनी त्या कॅनडाला शिफ्ट झाल्या. 1996 मध्ये ट्रस यांनी ऑक्सफर्डच्या मर्टन कॉलेजमधून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांमधील शिक्षण पूर्ण केले.
महाविद्यालयात शिकत असताना ट्रस लिबरल डेमोक्रॅट पक्षाचा प्रचार करत असत. त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लिबरल डेमोक्रॅट्सच्या अध्यक्षाही होत्या. याशिवाय लिबरल डेमोक्रॅट्स युथ अँड स्टुडंट्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या. पदवीनंतर म्हणजेच 1996 मध्ये ट्रस यांनी डेमोक्रॅट पक्ष सोडला आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून त्या याच पक्षात आहेत.
अशी झाली राजकीय प्रवासाला सुरूवात
1996 ते 2000 दरम्यान ट्रस यांनी शेलमध्ये अकाउंटंट म्हणून काम केले. एवढेच नव्हे तर, ट्रस यांनी यूके टेलिकम्युनिकेशन कंपनी केबल अँड वायरलेसमध्येही काम केले आहे. या कंपनीत त्या आर्थिक संचालक पदापर्यंत पोहोचल्या होत्या. 2005 मध्ये त्यांनी कंपनी सोडली. ट्रस यांनी 1998 आणि 2002 मध्ये ग्रीनविच लंडन बोरो काउंन्सिलच्या निवडणुकादेखील लढवल्या. मात्र, या दोन्हीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 4 मे 2006 रोजी त्यांनी नगरसेवक म्हणून पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर 2010 मध्ये त्या पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.