California student slaps teacher Esakal
ग्लोबल

Viral Video: तो मारत होता, मित्र हसत होते अन्... विद्यार्थ्याने अनेकवेळा लगावले शिक्षिकेच्या कानशिलात; पाहा संतापजनक व्हिडिओ

California Viral Video: हा व्हिडिओ आणि घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. या घटनेचा निषेध करताना ते म्हणाले की, हा व्हिडिओ शाळेची प्रतिमा मलिन करणारा आहे.

आशुतोष मसगौंडे

कॅलिफोर्नियातील एका शाळेतून एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाला कानशिलात मारताना दिसत आहे.

कानशिलात मारल्याने काही फरक पडणार नाही असे शिक्षिका म्हणाली, असे म्हणताच विद्यार्थ्याने शिक्षिकेला पुन्हा मारले त्यामुळे शिक्षिकेचा चष्मा फुटला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (California student slaps teacher)

कॅलिफोर्नियातील पार्कलँड हायस्कूलच्या विद्यार्थ्याने आपल्या वर्ग शिक्षिकेला कानशिलात मारली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये विद्यार्थी शिक्षिकेशी भांडताना आणि तिच्यावर हिंसक हल्ला करताना दिसत आहे. अनेक वेळा हल्ले झाले तरी, शिक्षिका विद्यार्थ्याच्या शाब्दिक आणि शारीरिक हल्ल्यांना शांतपणे प्रतिसाद देताना दिसत. दरम्यान विद्यार्थ्याने शिक्षिकेला अनेकवेळा थप्पड मारल्याने त्यांचा चष्मा फुटला.

पार्कलँड हायस्कूलचे प्राचार्य नोएल कीनर यांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. शाळेत असे प्रकार घडत नाहीत, तसेच असे प्रकार आम्ही सहनही करणार नाही, असे ते म्हणाले.

हा व्हिडिओ आणि घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. या घटनेचा निषेध करताना ते म्हणाले की, हा व्हिडिओ शाळेची प्रतिमा मलिन करणारा आहे.

तर पोलीस अधिकारी बॉबी एफ. किमब्रो ज्युनियर म्हणाले की, ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे. हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील पवित्र नात्याचा अपमान करत आहेत, जेव्हा आपल्याला ज्ञान देणाऱ्यांवरच हल्ले होत असतील तर, इतर कोणीही सुरक्षित नाही. नवीन पिढी आणि तरुण कुठे चालले आहेत याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

Ambulance Policy: रुग्णांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रात नवे अ‍ॅम्ब्युलन्स धोरण लागू; ४ अ‍ॅप्सशी जोडणार, जाणून घ्या नवी प्रणाली

100 मुलांचा बाप! रशियाकडून दहशतवादाला मदत केल्याचा आरोप; आजही 15 कोटी भारतीय वापरतात त्याचे अॅप, नेमकं प्रकरण काय?

Amit Shaha : अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान २३० काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; पोलिसांवर अधिकार उल्लंघनाचा आरोप

Latest Marathi News Live Update : पुण्यात पॉवर सब-स्टेशन प्रकल्पाच्या कार्यालयाची अज्ज्ञातांकडून तोडफोड

SCROLL FOR NEXT