Canada Esakal
ग्लोबल

Canada: खलिस्तानी समर्थकांनी कॅनडातील आणखी एका हिंदू मंदिराची केली तोडफोड अन्...; घटना CCTVमध्ये कैद

कॅनडात खलिस्तानी अतिरेक्यांकडून हिंदू मंदिरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

कॅनडात खलिस्तानी अतिरेक्यांकडून हिंदू मंदिरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. काही खलिस्तानी समर्थकांनी शनिवारी मध्यरात्री सरे येथील एका मंदिराची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर भारतीय समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी मंदिराच्या मुख्य दरवाजावर खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर यांच्या मृत्यूबाबत सार्वमताचे पोस्टर्स चिकटवण्यात आले आहे.

ही संपुर्ण घटना मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. ज्यामध्ये दोन लोक मंदिरात आल्याचे दिसत आहे. दोघांनीही आपले चेहरे लपवले आहेत. निळा पगडी घातलेला माणूस मंदिराच्या मुख्य दरवाजावर खलिस्तानी सार्वमताचे पोस्टर लावतो आणि त्यानंतर दोघेही तिथून पळून जातात.

खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर, ज्याचे पोस्टर मंदिराबाहेर लावण्यात आले होते, त्याची यावर्षी 18 जून रोजी कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. नुकतीच भारत सरकारने ४१ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली, त्यात हरदीप सिंह निज्जरचे नाव होते.

हरदीप निज्जरवर कॅनडातील सरे येथे गोळी झाडण्यात आली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तो कॅनडाच्या शिख फॉर जस्टिस या शीख संघटनेशी संबंधित होता. तो पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील रहिवासी होता. 2022 च्या सुरुवातीला, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पंजाबमधील जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल फरारी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. NIA च्या म्हणण्यानुसार, पुजाऱ्याच्या हत्येचा कट खलिस्तान टायगर फोर्सने (KTF) रचला होता.

यापूर्वीही मंदिरांवर हल्ले झाले आहेत

कॅनडातील हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मंदिरांवर हिंदू आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची अशीच प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आली आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये ओंटारियो प्रांतातील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली होती आणि त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंदिराच्या प्रतिनिधींनीही याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

मंदिरे सातत्याने होत आहेत लक्ष्य

गेल्या वर्षभरात मंदिरांना लक्ष्य करून भिंतींवर आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्याची ५० हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. काही घटनांमध्ये मंदिरांमध्ये भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली गेली होती. याशिवाय फुटीरतावादी खलिस्तान चळवळीचे संस्थापक जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे वर्णन 'शहीद' असे करण्यात आले होते.

घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत

भारतीयांविरुद्ध द्वेष आणि भारतविरोधी कारवायांसंबंधीच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. भारत सरकारने या घटनांचा योग्य तपास करण्याची विनंती केली होती. कॅनडा सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2019 ते 2021 दरम्यान, कॅनडामध्ये धर्म, आणि वंशाशी संबंधित द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे अल्पसंख्याक समुदायांमध्ये विशेषतः भारतीय समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT