Justin Trudeau 
ग्लोबल

Justin Trudeau: 'भारत कॅनडासाठी दुसरा धोकादायक देश'; जस्टिन ट्रुडोंच्या मोदींना शुभेच्छा अन् जाळ संगटच

India-Canada strain: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी मोदी यांचे अभिनंदन केले आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी मोदी यांचे अभिनंदन केले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच कॅनडाच्या एका रिपोर्टमध्ये भारत दुसरा धोकादायक देश असल्याचं म्हणण्यात आलं होतं.

ट्रूडो यांनी मोदींना शुभेच्छा देताना म्हटलंय की, 'कॅनडा मोदी सरकारसोबत मानवाधिकार, विविधता आणि कायद्याच्या राज्यासाठी सोबत मिळून काम करेल. त्यांना विजयासाठी शुभेच्छा' एक दिवसापूर्वीच कॅनडा सरकारच्या एका रिपोर्टमध्ये भारताविरोधात जाळ काढण्यात आला होता. चीननंतर भारत हा कॅनडाच्या लोकशाहीसाठी धोकादायक देश आहे असं या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं होतं.

खलिस्तानी अतिरेकेच्या हत्येवरून कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे आधीच दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. त्यातच नव्या रिपोर्टमध्ये भारताच्या केलेल्या उल्लेखामुळे तणावात भर पडणार आहे. ऐकीकडे ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात, तर दुसरीकडे कॅनडाच्या रिपोर्टमध्ये भारताला लक्ष्य करण्यात आलं आहे.

खलिस्तानी अतिरेकी निज्जर याची हत्या भारतीय गुप्तहेरांनी केल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. याप्रकरणी भारतीय वंशाच्या चार लोकांना कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे. भारताने कॅनडाकडून झालेले आरोप फेटाळून लावले होते. तसेच याप्रकरणी पुरावे सादर करण्याचे आव्हान भारताने केले होते. या प्रकरणावरुन भारताने कॅनडाच्या राजदूतांना परत जाण्यास सांगितले होते. कॅनडाने देखील अशाच प्रकारचे पाऊल उचलले होते.

कॅनडाच्या आरोपानंतर अमेरिकेकडूनही भारतावर गंभीर आरोप झाला होता. खलिस्तानी अतिरेकी गुरुपतवत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट भारताच्या एक अधिकाऱ्याने रचल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी एकाला ताब्यात देखील घेण्यात आले आहे. सदर घटनेचा हवाला देत कॅनडाने भारतावर टीकेची झोड उठवली होती. तूर्तास दोन्ही देशांमधील संबंध ताणलेलेच राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT