Joe Biden  sakal
ग्लोबल

Joe Biden : ‘मीच डेमोक्रॅटिकचा उमेदवार ’

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पाच नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार मीच आहे. निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बुधवारी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘‘अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पाच नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार मीच आहे. निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बुधवारी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात झालेल्या वादविवाद चर्चेत (प्रेसिडेंशिअल डिबेट) ‘डेमॉक्रॅटिक’चे उमेदवार बायडेन यांची कामगिरी प्रभावहीन झाली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेत आघाडी घेतली.

बायडेन यांचे वाढत्या वयाचा मुद्दाही उमेदवारीसाठी अडचणीचा ठरत आहे. यामुळे पक्षाने दुसरा पर्याय द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे नावही पुढे आणले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांनी खुलासा करीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून तेच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निधी उभारणीसाठी केलेल्या ईमेलमध्ये बायडेन यांनी निवडणुकीतून हटणार नसल्याचे म्हटले आहे. ‘‘मी डेमॉक्रॅटिक पक्षाचा उमेदवार आहे.

मला कोणीही हटवू शकत नाही. मी सोडून जाणार नाही. शेवटपर्यंत मीच या शर्यतीत असेन आणि आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत,’’ असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. तुम्हाला एवढेच ऐकायचे असल्यास नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी (हॅरिस) आणि मला मदत करण्यासाठी निधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT