Centipedes Sakal
ग्लोबल

ऑस्ट्रेलियात एक हजार पायांची गोम

अनेक पायांचे अपृष्ठवंशी प्राण्यांच्या असंख्य जाती भविष्यात आढळण्याची शक्यता व्यक्त असतानाच शास्त्रज्ञांना एक जीव आढळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कॅनबेरा : अनेक पायांची गोम (Centipedes) बहुतेकांच्‍या परिचयाची आहे. जमिनीवरील पहिल्या वन्यजीव समजल्या जाणाऱ्या गोमच्या १३ हजार प्रजाती जगभरात आहेत. अशा प्रकारचे अनेक पायांचे अपृष्ठवंशी प्राण्यांच्या असंख्य जाती भविष्यात आढळण्याची शक्यता व्यक्त असतानाच शास्त्रज्ञांना एक जीव आढळला आहे, की ज्याला तब्बल एक हजार पाय आहेत.

शास्त्रज्ञांनी पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील (Western Australia) दक्षिण किनारपट्टीवर ९५ मिलिमीटर लांबीची गोम शोधली आहे. तिला एक हजार सहा पाय आहेत. जमिनीपासून २०० फूट खाली आढळलेला हा अनोख्या जीव पृथ्वीवरील सर्वांत लांब प्राणी असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याला ‘युमिलिपिज पर्सेफोन’ असे नाव दिले आहे. हा जीव शास्त्रज्ञांना मायक्रोस्कोपमधून पाहिला आहे.

इंग्रजीमध्ये या अपृष्ठवंशी प्राण्यांना ‘मिलिपेड’ असे नाव आहे. हे लॅटिन नाव असून त्याचा अर्थ ‘हजार पाय’ असा होतो. अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे ७५० पायांची गोम यापूर्वी सापडली होती. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत अपृष्ठवंशी गटातील अनेक प्रजातींचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांची माहिती होईपर्यंत त्या नामशेष होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ‘युमिलिपिज पर्सेफोन’ची रचना जुन्या प्रजातीपेक्षा खूप वेगळी आहे. प्राण्यांच्या उत्क्रांतीवर त्‍यांच्या अधिवासाचा खूप मोठा प्रभाव आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

काय? १६७.२ कोटींना विकलं गेलं ‘यशोदा-श्रीकृष्ण’ चित्र, यात नक्की विशेष काय? Viral

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT