ग्लोबल

चाँद नवाबच्या 'त्या' व्हिडीओचा लिलाव; तब्बल 46 लाखांना होणार विक्री

विनायक होगाडे

कराची: पाकिस्तानातील लोकप्रिय रिपोर्टर चाँद नवाब पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते चर्चेत येण्याचं कारण अर्थातच त्यांचा 'कराची से अंदरुने मुल्क'वाला व्हिडीओच कारणीभूत ठरला आहे. तुम्ही म्हणाल, आता काय झालं? पण आता त्याचा हा व्हिडीओच त्याला लखपती बनवणार आहे. चाँद नवाब आता आपल्या या व्हिडीओचा लिलाव करणार आहेत. या व्हिडीओसाठी त्यांनी लिलावाची किंमत तब्बल 46 लाख रुपये ठेवली आहे.

कोण आहे चाँद नवाब?

पाकिस्तानमधील कराचीतील पत्रकार चाँद नवाब २००८ मध्ये यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या आपल्या एका व्हिडिओमुळे तुफान चर्चेत आला होता. त्याचा हा गंमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. लाखो नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दिली होती. बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये देखील या व्हिडीओचा आधार घेण्यात आला होता. त्यातील नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेल्या पत्रकाराचा एक संवाद या चाँद नवाबच्या व्हिडीओवरच आधारलेला होता. आता चांद नवाबच्या याच हटके व्हिडिओचा लिलाव होणार आहे.

काय म्हटलंय चाँद नवाबने?

“मी चांद नवाब आहे. मी व्यवसायाने पत्रकार आहे. माझा एक व्हिडिओ २००८ मध्ये यूट्यूबवर आला होता. यामध्ये ईदच्या निमित्ताने रेल्वे स्थानकावर जमलेली गर्दी आणि तिथल्या परिस्थितीचा संदर्भ मी देत होतो. या दरम्यान मला अनेक वेळा थांबावे लागलं, कारण लोक सतत येत-जात होते. या सततच्या व्यत्ययामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि लाखो लोकांनी पाहिला आहे.”, असं चाँद नवाब यांनी लिलाव प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे.

चाँद नवाब यांचा हा व्हायरल व्हिडीओ आता डिजीटल संपत्ती म्हणून विक्री होणार आहे. इंडिया टुडेने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, चाँद नवाबने आपल्या या व्हिडीओचा लिलाव ठेवला आहे. चाँद नवाब यांनी फाउंडेशन ऍपवर हा व्हिडीओ लिलावासाठी नॉन फंगीबल टोकन अर्थात NFT म्हणून ठेवला आहे. NFT असा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर डिजीटल प्रॉपर्टीच्या माध्यमातून क्रिएटर्स पैसे कमावतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Toll Plaza Pass : अवघ्या ३४० रुपयांत मिळतोय टोल पास, करता येतो अमर्यादित प्रवास, 'या' वाहनधारकांना फायदा

SCROLL FOR NEXT