BRICS 
ग्लोबल

Chandrayaan 3 Update: "चांद्रयान काही तासांत चंद्रावर उतरणार, त्यामुळं..."; ब्रिक्स समिटच्या भारताला शुभेच्छा

जोहान्सबर्ग इथं सध्या ब्रिक्स समिट सुरु असून PM मोदी चांद्रयानाच्या लँडिंग सोहळा तिथूनच लाईव्ह पाहणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Mission Chandrayaan 3 : भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेंतर्गत यान येत्या दोन तासात चंद्रावर उतरणार आहे. यापार्श्वभूमीवर सध्या जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या ब्रिक्स समिटनं भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदींचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे. जोहान्सबर्ग इथं सध्या ब्रिक्स समिट सुरु असून PM मोदी चांद्रयानाच्या लँडिंग सोहळा तिथूनच लाईव्ह पाहणार आहेत. (Chandrayaan 3 Landing BRICS Summit Wishes India Good Luck)

समिटचं आयोजन करणारे दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी म्हटलं की, मी भारताचं अभिनंदन करु इच्छितो विशेषतः जेव्हा तुम्ही अंतराळ सहकाऱ्याच्या आवश्यकतेबाबत बोलता. त्यामुळं काही तासांतच भारताचं अंतराळ यान चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार आहे. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. (Latest Marathi News)

ब्रिक्स कुटुंबाच्या रुपानं ही आमच्यासाठी एक महत्वपूर्ण संधी आहे. तसेच आम्ही भारतासोबत हा क्षण अनुभवणार आहोत आणि आम्ही खूश आहोत, असंही रामाफोसा यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या कृतीचं कौतुक

दरम्यान, ब्रिक्स समिटची बैठक झाल्यानंतर विविध देशांच्या प्रमुखांचा ग्रुप फोटो काढतेवेळी मोदी स्टेजवर गेले असताना तिथं छोट्या आकारातील भारताचा राष्ट्रध्वज स्टेजवर पडल्याचं त्यांना दिसलं. (Marathi Tajya Batmya)

याकडं लक्ष जाताचं त्यांनी जमिनीवर पडलेल्या भारताचा तिरंगा उचलला आणि आपल्या कोटाच्या खिशात ठेवला. मोदींच्या या कृतीचा व्हिडिओ समोर आला असून यामुळं त्यांचं कौतुक होतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nakul Bhoir Case: नकुल भोईर हत्या प्रकरणाला वेगळं वळण, एकटीने पतीला कसं संपवलं? भावाने वहिनीविरोधात दिली तक्रार

Latest Marathi News Live Update : पर्यायी मार्गाचा वापर करा, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

Pune News: पुण्याला सोडतो म्हणत पहाटे ३ वाजता लिफ्ट दिली; वाटेतच झुडपात नेत अत्याचार, आरोपीला अटक

Action Under MCOCA : इचलकरंजीतील ‘एसएन गॅंग’च्या सहा जणांवर मोकाखाली कारवाई

Kolhapur Rape News : कोल्हापुरात क्रुरतेचा कळस! विळ्याचा धाक दाखवत बापाकडून पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT