Chandrayaan 3 Sakal
ग्लोबल

Chandrayaan 3: चंद्रावर मोहीमा का केल्या जातात? यातून नक्की साध्य काय होतं?

अमेरिकेचा नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर उतरणारा पहिला माणूस होता, तेव्हापासून मानवरहित मोहिमा सुरू झाल्या आहेत.

वैष्णवी कारंजकर

भारताची चांद्रयान-3 मोहीम सुरू होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची बहुप्रतिक्षित मोहीम शुक्रवारी प्रक्षेपणासाठी सज्ज झाली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. अमेरिकेचा नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर उतरणारा पहिला माणूस होता, तेव्हापासून मानवरहित मोहिमा सुरू झाल्या आहेत.

पृथ्वी आणि विश्वाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी चंद्र हे वैज्ञानिकांसाठी लक्ष्य बनलं आहे. चांद्रयान-२ च्या क्रॅश लँडिंगनंतर चार वर्षांनी भारताने पुन्हा ही मोहीम राबवली आहे. जर चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली, तर अंतराळ क्षेत्रात भारताचं हे आणखी एक मोठं यश असेल. दरम्यान, चांद्रयान-३ मोहीम काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचा उद्देश काय आहे? चंद्रावर शोध का सुरू आहे? चंद्र मोहिमेतून मानवाला काय मिळणार आहे?

इस्रोच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान-३ मिशन चांद्रयान-२ चा पुढचा टप्पा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चाचण्या घेईल. यात प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर असेल. चांद्रयान-३ चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणं तयार करण्यात आली आहेत. अल्गोरिदम सुधारले आहेत. चांद्रयान-२ मोहीम ज्या कारणांमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकली नाही त्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

 १४ जुलै रोजी दुपारी २:३५ वाजता चांद्रयान श्रीहरिकोटा केंद्रातून उड्डाण करेल आणि जर सर्व काही नियोजनानुसार झालं तर २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरेल. बुधवारी श्रीहरिकोटा इथं सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये चांद्रयान-३ असलेले एन्कॅप्स्युलेटेड असेंबली LVM3 सह एकत्रित करण्यात आली. या मोहिमेमुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर लँड करणारा भारत हा जगातला चौथा देश बनणार आहे.

चांद्रयान-३ सह, एकट्या भारताच्या तीन चांद्रमोहिमा असतील. याशिवाय, जगातल्या सर्व राष्ट्रीय आणि खाजगी अवकाश संस्थांनी चंद्रावर मोहिमा केल्या आहेत किंवा मोहीमा करण्याची तयारी करत आहेत. या मोहिमांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. यामुळंच आजही चंद्रावरचं संशोधन आव्हान मानलं जातं.

अमेरिकेच्या अपोलो ११ मोहिमेदरम्यान १९६९ मध्ये चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस नील आर्मस्ट्राँग होता. या ऐतिहासिक मोहिमच्या अनेक दशकांनंतर चंद्राचा शोध माणसांसाठी महत्त्वाचा ठरला. पृथ्वी आणि विश्वाच्या इतिहासाचा अभ्यास करताना चंद्र हा खजिना असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

चंद्रावर मोहिमा पाठवण्याच्या उद्दिष्टांबाबत, नासाच्या वेबसाइटवर असं म्हटलं आहे की चंद्र पृथ्वीपासून तयार झाला आणि पृथ्वीच्या सुरुवातीच्या इतिहासाचे पुरावे आहेत. पृथ्वीवर हे पुरावे भूगर्भीय प्रक्रियेमुळे नष्ट झाले आहेत. नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी-चंद्र प्रणाली आणि सौर यंत्रणा कशी निर्माण झाली आणि विकसित झाली यासारख्या प्रश्नांची उत्तरं वैज्ञानिक शोधू शकतात. तसंच, पृथ्वीच्या इतिहासावर आणि भविष्यावर प्रभाव टाकण्यात लघुग्रहांच्या प्रभावाची भूमिकाही निश्चित केली जाऊ शकते.

नासाच्या मते, चंद्रावरच्या या मोहिमेमध्ये अनेक तांत्रिक आव्हानं आहेत. जोखीम कमी करण्यासाठी आणि भविष्यातील मोहिमांची उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान, उड्डाण क्षमता, आणि संशोधन तंत्रांची चाचणी घेण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. चंद्राची ही मोहीम माणसांना दुसऱ्या जगात राहण्याचा आणि काम करण्याचा पहिला अनुभव देईल. या मोहिमेमुळे प्रगत साहित्य आणि उपकरणं तापमान आणि अंतराळातल्या अत्यंत किरणोत्सर्गाची चाचणी घेता येईल.

मानवी कामांमध्ये मदत करण्यासाठी, दुर्गम ठिकाणं शोधण्यासाठी आणि धोकादायक भागात माहिती गोळा करण्यासाठी रोबोट्सचा सर्वोत्तम वापर कसा करावा हे माणूस शिकेल. NASA ने असं म्हटलं आहे की चंद्रावर यशस्वीरित्या मोहिम केल्याने, मानव पृथ्वीवरील जीवन वाढवतील आणि आपल्या उर्वरित सौरमालेचा आणि त्यापुढच् भाग शोधण्यासाठी तयार होतील.

 पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वाकर्षण आणि जास्त किरणोत्सर्ग असलेल्या वातावरणात अंतराळवीरांना निरोगी ठेवणं हे वैद्यकीय संशोधकांसमोर मोठं आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

Angkrish Raghuvanshi: आयपीएल सामन्यात कोणत्या नियमामुळे अंगकृश रघुवंशी बाद झाला? ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड म्हणजे नेमकं काय? वाचा...

PMP Bus Incident: पीएमपी बस पळविणारा आरोपी अटकेत; मानसिक असंतुलनामुळे ससून रुग्णालयात उपचार सुरू

दगडाने मारहाण, चाकू, फाइटर, वस्तराने शरीरावर वार, तरुणाला निर्घृणपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT