cheated wife ,indonesia,punished  
ग्लोबल

विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर; मास्क बांधून दिले चाबकाचे फटके

सकाळ डिजिटल टीम

कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीला रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. इंडोनेशियातील पती-पत्नीचा टोकाला गेलेला वाद सध्या चांगलाच चर्चेत आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यानंतर पत्नीने आपल्याला धोका देणाऱ्या पतीला भरचौकात चाबकाचे फटके देण्याची शिक्षा केली.  कोरोनाजन्य परिस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे इंडोनेशियावर टीका होत आहे. मात्र यावर आता स्थानिक गुन्हे शाखा विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.  

शिक्षेची अंमलबजावणी करत असताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती, असे गुन्हे शाखेने म्हटले आहे. दोषी आरोपीला मास्क बांधून त्याला शिक्षा करण्यात आली. शिक्षा देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणती लक्षणं आहेत का? याची देखील तपासणी करण्यात आल्याचे गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.   

इंडोनेशियातील आसेहमध्ये विवाहबाह्य संबंध उघडकीस आलेल्या तरुण-तरुणीला शुक्रवारी  शरियत कायद्यानुसार शिक्षा करण्यात आली होती. भर चौकात देण्यात आलेल्या शिक्षेवेळी जवळपासच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगच्या नियम झुगारुन हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा रंगत असताना यावर स्थानिक  गुन्हा शाखा विभागाचे प्रमुख ऑगस केलना यांच्या मुलाने प्रतिक्रिया दिली आहे. याठिकाणी गर्दीत सहभागी झालेल्या प्रत्येकाची कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याची चाचपणी करण्यात आली होती. सर्दी, खोकला आणि ताप याची तपासणी करुनच लोकांना या घटनास्थळी प्रवेश देण्यात आला होता, असे स्पष्टीकरण आता देण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : उकाड्याने हैराण पुणेकरांना अखेर दिलासा! सिंहगड, कोथरूडमध्ये रिमझिम सरी, विश्रांतवाडीतही पावसाची हजेरी

BEST Strike: 'बेस्ट'कामगार थेट विधानभवनावर धडकणार; २५ हजार कामगार रस्त्यावर उतरणार, कृती समितीचा इशारा, मुंबईत हायअलर्ट!

Bihar Uranium Scare Explained: बिहारमधील आईच्या दुधात युरेनियम असल्याचा दावा अखेर खोटा ठरला? BARC च्या अहवालातून मोठा खुलासा

PF खातेदारांसाठी खुशखबर! कारण न देता मिळणार PFची संपूर्ण रक्कम? जाणून घ्या नवा नियम

India Squad Change: भारताच्या T20I संघात अचानक बदल! स्टार खेळाडू अचानक संघातून बाहेर, BCCI ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT