ग्लोबल

विमानांना प्रवेशबाबत चीनचे एक पाऊल मागे; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर निकष बदलला 

वृत्तसंस्था

बीजिंग - विमानांना प्रवेशबंदीच्या चालीला अमेरिकेने तसेच प्रत्यूत्तर दिल्यानंतर चीनला एक पाऊल माघार घ्यावी लागली. आठ जूनपासून चीनमधील पसंतीच्या एका शहरात आठवड्यातून एकदा परदेशांतून विमाने येऊ शकतील अशी घोषणा करण्यात आली. यामुळे कोरोनावरून या दोन देशांत पेटलेला वाद आणखी चिघळण्याचे एक कारण कमी झाले.

चीनच्या नागरी वाहतुक प्रशासनाने मार्चच्या अखेरीस एक निर्णय घेतला. त्यानुसार चिनी कंपन्या कोणत्याही देशातील एकाच मार्गावर आठवड्यातून एकदा विमान नेतील. १२ मार्च रोजी जेवढी उड्डाणे केली त्यापेक्षा जास्त विमानांना परवानगी मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले होते. प्रत्यक्षात अमेरिकेने १२ मार्चपर्यंत सर्व प्रवासी विमाने थांबविली होती. त्यामुळे त्यांना चीनसाठी विमान सेवा सुरु करता येत नव्हती व चीनमधून मात्र विमाने येऊ शकत होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी चीनवर दडपण आणण्यासाठी चिनी प्रवासी विमानांना १६ जूनपासून अमेरिकेत येण्यास व अमेरिकेतून उड्डाण करण्यास बंदी घातली. 

जगभरातून आणखी ३८ विमाने मुंबईत येणार; आतापर्यंत 'एवढ्या' नागरिकांना केले 'एअरलिफ्ट!'

मग अखेर चीनला माघार घेऊन निकष बदलावा लागला. चीनमध्ये विमानांतून येणारे प्रवासी सलग तीन आठवडे कोरोना पॉझिटीव्ह आढळले नाहीत तर आठवड्याला दोन विमानांना परवानगी मिळेल, असेही जाहीर करण्यात आले. 

परदेशी नागरिकांची ओरड 

चीनचे अनेक नागरिक परदेशांत अडकले आहेत. त्यामुळे जूनमध्ये तिप्पट विमानांना परवानगी मिळेल असे चीनने जाहीर केले. दुसरीकडे सिंगापूर आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांतून व्यवसायासाठी येणाऱ्या प्रवाशांची प्रवेश प्रक्रिया द्रुतगती करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पाच प्रवासी पॉझिटीव्ह... 
चीनमध्ये आल्यावर प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी होईल. एका विमानातून आलेले पाच किंवा जास्त प्रवासी पॉझिटीव्ह आढळले तर संबंधित मार्गावरील विमान सेवा एका आठवड्यासाठी स्थगित केली जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT