ग्लोबल

बिजिंग पूर्ण लॉक; नव्या डेल्टा व्हेरियंटमुळे चीन घाबरले

सकाळ डिजिटल टीम

ज्या शहरांमध्ये रुग्ण आढळले आहेत तिथे लोकांच्या प्रवेशावर आणि बाहेर जाण्यावर निर्बंध घातले आहेत.

बिजिंग - दुधाने तोंड पोळल्यानंतर आता चीन ताकसुद्धा फुंकून प्यायला लागले आहे. चीनमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली आहे. यामुळे आता राजधानी बिजिंगमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली की, येत्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण आणखी वाढतील. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रीय आऱोग्य आयोगाचे अधिकारी वू लियांगयू यांनी रविवारी सांगितलं की, देशात नव्याने सापडणारे रुग्ण हे डेल्टा व्हेरिअंटच्या माध्यमातून बाधित झालेले आहेत. देशात रविवारी ४३ रुग्ण सापडले आहेत. यात चार जण स्थानिकांच्या संपर्कात आल्यानं बाधित झाले.

आय़ोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी म्हटलं की, संसर्गाची लाट ही १७ ऑक्टोबरपासून आठवड्याभरात ११ प्रांतांमध्ये पसरली आहे. बहुतांश संसर्ग झालेल्या लोकांनी वेगवेगळ्या भागात प्रवास केला आहे. देशात आता ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तिथे इमर्जन्सी मोड लागू करा असं आवाहनही करण्यात आलं आहे.

परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांसु प्रांतातील काही शहरांमध्ये ज्यात लांझहोऊ आणि मंगोलियाचा समावेश आहे. तिथे संसर्गामुळे बस आणि टॅक्सी सेवा बंद कऱण्यात आल्या आहेत. चीनमध्ये शनिवारी २६ रुग्ण आढळले होते. यातील मंगोलियात ७, गांसु, निंग्जियामध्ये प्रत्येकी सहा, बिंजिंगमध्ये चार तर हेबै, हुनान आणि शानक्सीमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला होता.

बिजिंगच्या तिन जिल्ह्यांसह हेडियनपर्यंत संसर्ग पसरला आहे. कोरोनामुळे बिजिंगमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी आय़ोजित कऱण्यात आलेली मॅरेथॉन रद्द कऱण्यात आली आहे. ज्या शहरांमध्ये रुग्ण आढळले आहेत तिथे लोकांच्या प्रवेशावर आणि बाहेर जाण्यावर निर्बंध घातले आहेत. मॅरेथॉनमध्ये तब्बल २६ हजार स्पर्धक सहभागी होणार होते. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता मॅरेथॉन रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

जगात सर्वाधिक लसीकऱण चीनने केलं आहे. जवळपास ७५ टक्क्यांहून जास्त लोकसंख्येला लस देण्यात आली आहे. सध्या ज्यांना सहा महिन्यापूर्वी लस देण्यात आली आहे अशा वृद्धांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. सिनोवॅक आणि सिनोफार्म यांचा सर्वाधिक वापर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

Mumbai News: तिसऱ्या, चौथ्या मुंबईसाठी मॅपिंग, दोन हजार चौ. किमीचे मोजमाप पूर्ण; मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर

Khidrapur Kopeshwar Temple : इतिहासाला मिळणार नवी दिशा? खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आढळली प्राचीन मूर्ती; सापडलेल्या अवशेषांचे रहस्य काय?

Amravati Teachers Constituency : महायुती व महाविकासमध्ये दुफळी, बंडखोरी उफाळणार काँग्रेसकडून अदिती पोहरे, भाजपची भूमिका स्पष्ट नाही, सरनाईक यांना आव्हान

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

SCROLL FOR NEXT