China Businessman
China Businessman esakal
ग्लोबल

China Businessman : अजूनही बेपत्ता होतायत चिनी अब्जाधीश, आधी जिओ जियानहुआ, जॅकमा अन् आता हा उद्योगपती..

सकाळ डिजिटल टीम

China Businessman : चीनचे अब्जाधीश बेपत्ता होण्याची प्रकरणे थांबतच नाही आहेत. २ वर्षांपूर्वी अलीबाबाचे फाउंडर जॅकमा बेपत्ता झाले होते आणि त्यांचा सरकारकडून शोध घेतला जात होता. अशातच आता हाय प्रोफाइल बँकर बाओ फॅन बेपत्ता झाले आहेत. ते बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्याच कंपनीकडून दिली गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याचं सांगितलं जात आहे. बाओ फॅन यांची कंपनी चायना रेनेसॉन्स होल्डिंग्सने हाँगकाँग स्टॉक एक्सेंचेज माहिती दिली आहे की, बाओ फॅन सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीच माहिती नाही.

कोण आहेत बाओ फॅन?

बाओ फॅन हे चीनच्या फिनटेक मार्केटमधील एक मोठं नाव आहे. ते चायना रेनेसान्स कंपनीचे मालक आहेत. चायना रेनेसान्स 2018 मध्ये हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजच्या यादीत आलं. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर 2021 मध्ये त्यांची लिस्टिंग देखील दोन वर्षांपूर्वी झाली होती. बाओ फॅन यांनी ही कंपनी सुमारे 18 वर्षांपूर्वी सुरु केली. फॅन यांच्याकडे या कंपनीचे 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाओ यांनी चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील काही मोठ्या डीलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या ब्रोकिंग लिस्टमध्ये दीदी, कुएदी, फूड डिलिव्हरी कंपन्या Meituan आणि Dianping आणि इतर अनेक मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे.

सरकार चौकशी करत होते..

बाओ यांनी 2005 मध्ये बुटीक सल्लागार गुंतवणूक फर्म म्हणून चायना रेनेसान्सची स्थापना केली. तेव्हापासून ही चीनमधील शीर्ष फिनटेक संस्थेपैकी एक आहे. ही कंपनी देशातील अनेक तांत्रिक कंपन्यांमध्ये व्यावसायिक सौदे करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाओ यांची त्यांच्या कंपनीचे अध्यक्ष कोंग लिन यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अनेक महिन्यांपासून चौकशी केली जात होती. खरं तर, 2021 मध्ये शी जिनपिंग यांच्या सरकारने चीनच्या आर्थिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात चौकशी सुरू केली. आतापर्यंत देशातील बड्या कंपन्या या तपासाच्या कचाट्यात आल्या आहेत.

चीनमध्ये यापूर्वीही व्यापारी बेपत्ता झाले आहेत.एखादा मोठा चिनी उद्योगपती बेपत्ता होण्याची ही पहिलीच वेळ नाही. वास्तविक चीन सरकार कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायदेशीर मदतीशिवाय संशयितांना अनेक वर्षे कोठडीत ठेवू शकते.

2017 मध्ये चीनचे अब्जाधीश उद्योगपती जिओ जियानहुआ हाँगकाँगमधून बेपत्ता झाले होते. जिओला त्याच्या हॉटेलमधून चिनी सुरक्षा एजंटांनी उचलले. पाच वर्षांनंतर तो चीनमध्ये असल्याची बातमी आली. जिथे सरकारने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 13 वर्षांची शिक्षा सुनावली आणि 66 हजार कोटींचा दंडही ठोठावला.

2020 साली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि अलीबाबा ग्रुपचे मालक जॅक मा बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. ते तीन महिने बेपत्ता होते. त्यांनी चीनच्या आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर जोरदार टीका केली. यानंतर त्यांचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतही त्यांचा वाद झाला. त्यानंतर ते बेपत्ता होते. पण तीन महिन्यानंतर ते सुखरुप सर्वांसमोर आले. त्यानंतर त्यांच्या कंपनीचे शेअर्स वाढले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT