Corona Patient Sakal
ग्लोबल

Viral Video : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा

निनाद कुलकर्णी

China Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. बाधितामुळे चीनमधील रूग्णालये आणि शवागृहे तुडुंब भरली आहेत.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ठिकठिकाणी लांबच लांब रांग लागल्याचे व्हिडिओ समोर येत आहे. वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे अंत्यसंस्कारासाठीदेखील नातेवाईकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. ज्यामध्ये नातेवाईक मृतदेह घेऊन रांगेत उभे आहेत. वाढत्या मृत्यूमुळे चीनने मृतांची आकडेवारी मोजणे थांबवल्याचे सांगितले जात आहे.

समोर येत असलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये दररोज १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. याशिवाय दररोज हजारो जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

दुसरीकडे ही सर्व आकडेवारी खोटी असल्याचा दावा चीन करत आहे. मात्र, सोशल मीडियावरून समोर येत असलेले व्हिडिओमुळे चीनमध्ये कोरोनाने थैमान घतल्याचे उघड होत आहे.

अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब लागलेल्या रांगेचा आणि भीषणता दाखवणारा हा व्हिडिओ एरिक फीगल-डिंग यांनी शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अनेक नागरिक प्रियजनांचे मृतदेह अंत्यविधी करण्यासाठी स्ट्रेचरवर ठेऊन तासनतास उभे असल्याचे दिसून येत आहे.

एका आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये सुमारे 250 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, परंतु चीनकडून अद्याप कोणतीही अचूक आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

वाढत्या बाधितांची आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येने चीनमधील सरकारी यंत्रणा पूर्णतः कोलमडून गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT