China Covid Outbreak esakal
ग्लोबल

China Covid Outbreak : चीनमध्ये साधी डोकेदुखीची गोळी मिळेना; कोरोनाचा हाहाःकार

संतोष कानडे

नवी दिल्लीः चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे. चीनमधून खरी आकडेवारी समोर येत नाही मात्र मीडिया रिपोर्डनुसार दररोज शेकडो लोकांचा संसर्गामुळे मृत्यू होतोय.

गंभीर बाब म्हणजे सध्या चीनमध्ये मेडिसिनचा तुटवडा जाणवत आहे. साधी पेनकिलर किंवा डोक्याच्या गोळीसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत.

Ibuprofen यासारखं साधं औषढ दुर्मिळ झालं आहे. ही गोळी भारतात अगदी सहजगत्या मिळते. महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती मेडिकलमधून फक्त 6 आयबुप्रोफेन टॅबलेट घेऊ शकतो. लोकांच्या जास्तीच्या मेडिसीन खरेदीवर सरकारने निर्बंध लावल्याची माहिती आहे.

'ग्लोबल टाईम्स'च्या माहितीनुसार जियांग्सू राज्याची राजधानी असलेल्या नानजिंगमध्ये आयबुप्रोफेनचा तुटवडा दूर करण्यासाठी रोज २० लाख गोळ्या मार्केटमध्ये पाठवल्या जात आहेत. तरीही लोकांना त्या अपुऱ्या पडतायत. त्यामुळे एका व्यक्तीला केवळ ६ टॅबलेट दिल्या जात आहेत.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सध्या चीनमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट बीए.५.२ आणि बीएफ. ७ ने हाहाःकार माजवला आहे. या नव्या व्हेरिएंचं संक्रमण गतीने होत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या ९० दिवसांमध्ये चीनच्या ६० टक्के जनतेला कोरोनाची लागण होऊ शकते. एकूणच पुन्हा एकदा जगभरात कोरोनाच्या लाटेचा धोका व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT