China defense budget is three times of India 7 2 percent more provision this year background of Taiwan conflict Sakal
ग्लोबल

China Defense Budget : चीनचा संरक्षण अर्थसंकल्प भारताच्या तिप्पट; तैवान संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा ७.२ टक्के जास्त तरतूद

अमेरिका, भारत, फिलिपिन्स आणि तैवान या देशांबरोबर तणावपूर्ण संबंध लक्षात घेऊन अर्थव्यवस्था मंदावली असतानाही चीनने यंदाही संरक्षण विभागाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वाढ केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : अमेरिका, भारत, फिलिपिन्स आणि तैवान या देशांबरोबर तणावपूर्ण संबंध लक्षात घेऊन अर्थव्यवस्था मंदावली असतानाही चीनने यंदाही संरक्षण विभागाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वाढ केली आहे.

चीनने सलग तिसऱ्या वर्षी संरक्षण खर्चात सात टक्क्यांनी वाढ केली आहे. भारताच्या संरक्षण खर्चापेक्षा ही वाढ तिप्पट असून अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पापेक्षा खूप कमी आहे. चीनने २०२४ च्या संरक्षण अर्थसंकल्पात ७.२ टक्के वाढ केली आहे. तो आता २३० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. भारताची संरक्षणविषयक तरतूद ७५ अब्ज डॉलर आहे.

चीनच्या तुलनेत हा खर्च तिपटीने कमी आहे. अमेरिकेच्या भारत- प्रशांत क्षेत्राविषयक समितीच्या विश्‍लेषणानुसार चीनसाठी २०२७ वर्ष अत्यंत महत्त्वाचे असेल. त्या वर्षात ‘द पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) या चिनी सैन्यदलाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत.

तसेच तोपर्यंत सैन्याच्या बळावर तैवान ताब्यात घेण्याचा अध्यक्ष शी जिनपिंग यांचा प्रयत्न असेल. चीनची आण्विक शक्ती आणि पारंपरिक सैन्यात जलद सुधारणा करण्यावर ‘पीएलए’चा भर आहे. हिंद महासागरात जहाजे तैनात करून भारत-प्रशांत क्षेत्रावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न ‘पीएलए’ करीत असून जपानने चीनला अटकाव केला नाही तर दक्षिण चिनी समुद्रात चीन सागरी आणि क्षेपणास्त्र शक्ती अधिक मजबूत करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT