Chinese Man became deaf after kissing eSakal
ग्लोबल

China Bizarre : गर्लफ्रेंडला सलग 10 मिनिटं केलं किस.. अन् बॉयफ्रेंडला ऐकू येणंच बंद झालं! रुग्णालयात उपचार सुरू

Man become deaf : डॉक्टरांनी सांगितलं, की अधिक एक्साईट होऊन किस केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात.

Sudesh

China News : चीनमधून एक विचित्र मात्र तितकाच गंभीर प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला आपल्या गर्लफ्रेंडला किस करणं चांगलंच महागात पडलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडला सलग 10 मिनिटं किस केल्यानंतर या तरुणाला ऐकू येणंच बंद झालं. यामुळे त्याला रुग्णालयात भरती करावं लागलं आहे.

चीनमधील मॉर्निंग पोस्टने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 22 ऑगस्टचं आहे. हे कपल एकमेकांना किस करत असताना बॉयफ्रेंडला अचानक कानात दुखू लागलं. यानंतर युवकाला थेट रुग्णालयात नेण्यात आलं. याठिकाणी तपासणी केल्यानंतर या तरुणाच्या कानाचा पडदा फाटला असल्याचं स्पष्ट झालं.

काय आहे कारण?

डॉक्टरांनी सांगितलं, की अधिक एक्साईट होऊन किस केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. अधिक उत्तेजित होऊन किस करत असल्यास, मोठ्या प्रमाणात सक्शन निर्माण होते. यामुळे कानाच्या पडद्यांवर ताण पडतो. हा ताण अधिक वाढल्यास कानाचा पडदा फाटू शकतो. हे कपल दहा मिनिटांपर्यंत किस करत होते. यामुळे अधिक सक्शन निर्माण होऊन, या तरुणाच्या कानाचा पडदा फाटला; असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

उपचार शक्य

या तरुणावर उपचार करुन त्याचं बहिरेपण घालवणं शक्य असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. अर्थात, पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. (Global News)

यापूर्वीही घडल्यात घटना

यापूर्वी 2008 साली देखील चीनमध्ये अशी घटना समोर आली होती. आपल्या बॉयफ्रेंडला अधिक वेळ किस केल्यामुळे एका तरुणीला बहिरेपण आलं होतं. तसंच, यावर्षी जुलै महिन्यात एका कपलच्या बाबतीत अशीच घटना होऊन, दोघांनाही बहिरेपण आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT