china map jammu kashmir and arunachal pradesh part of india bri
china map jammu kashmir and arunachal pradesh part of india bri 
ग्लोबल

चीन नमलं, जम्मू-काश्मीर व अरुणाचनला दाखवले भारताच्या नकाशात

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य करत चीनने नमले आहे. बीजिंग येथे सुरू असलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) समिटदरम्यान चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले असून, या नकाशांमध्ये जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे दाखवले आहे.

भारताने या समीटवर बहिष्कार घातला आहे. तत्पूर्वी 2017मध्येही भारत BRIच्या पहिल्या समीटमध्ये सहभागी झालेला नव्हता. या समीटमध्ये 37 देशांचा सहभाग आहे. BRI या प्रकल्पाचा उद्देश राज्यमार्ग, रेल्वे लाइन, बंदर आणि समुद्री मार्गाच्या माध्यमातून आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडण्याचा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या समीटची सुरुवात गुरुवारी (ता. 25) झाली आहे. हा नकाशा चीनच्या कॉमर्स मिनिस्ट्रीने प्रदर्शित केला आहे. जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा हिस्सा दाखवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, चीन नमले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असलेले हजारो नकाशे नष्ट केले होते. चीनने उचललेल्या या पावलामुळे तज्ज्ञही बुचकळ्यात पडले आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनचे सरकारी चॅनेल CGTNने पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीरही वेगळं दाखवले होते. मात्र, संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा हिस्सा दाखवून भारताला खूश करण्याची चीनची ही चाल तर नाही ना? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या नकाशातून बाहेर दाखवल्याने त्याचा परिणाम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरवरही होण्याची शक्यता आहे. भारताने या प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमधून नेण्यास आधीच विरोध दर्शवला आहे. चीनने पाकव्याप्त काश्मीरमधल्या मूलभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक केली आहे. परंतु, भारताने प्रोजेक्टवर नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT